“कहो दील से नातू फिर से” सध्या ही गुहागर भाजपा ची टॅग लाईन सोशल मिडिया जोरदार व्हायरल होत आहे……
कहो दील से नातू फिरसे…! ही टॅग लाईन सध्या गुहागर विधानसभा मदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मध्ये चांगली च प्रसिद्ध झाली आहे, यावेळी कोणत्याही स्थितीत गुहागर विधानसभा मतदार संघावर भाजपा चा पुन्हा एकदा झेंडा फडकावयचा या इर्षेने गुहागर – चिपळूण – खेड मधील भाजपा कार्यकर्त्या मध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
गुहागर मतदार संघ हा एके काळी भाजप चा बालेकिल्ला म्हणून च अभेद्य होता परंतु २००९ साली झालेल्या मतदार संघाची फेर रचना मध्ये खेड चा खाडी पट्टा आणि चिपळूण तालुक्यातील काही भाग हा ह्या मतदार संघात समाविष्ट करण्यात आला आणि त्याच वेळी शिवसेना – भाजप युती मध्ये हा मतदार संघ शिवसेच्या वाट्याला गेल्याने त्यावेळचे विद्यमान आमदार विनय नातू सह त्यांचे समर्थक हि नाराज झाले. त्यावेळी अनेक भाजप समर्थक आणि त्यांचे पारंपरिक मतदार यांना हि धक्का बसला त्याच रागातून आ. विनय नातू यांनी श्रीधर सेना स्थापन केली आणि बंडखोरी करून उमेदवारी भरली.
त्याच वेळी शिवसेना म्हणजेच त्यावेळच्या भाजप – सेना युती कडून अधिकृत रामदास भाई यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांचें विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेस चे भास्कर शेठ साहजिक च तिघेही उमेदवार तगडे असल्याने निवडणुकीला ही रंगात आली होती. परंतु भाजप शिवसेना यांचे मत विभाजन झाल्याने त्यांनाच त्याचा फटका बसला,आणि भास्कर शेठ जाधव यांनी यां मतदार संघातून विजय मिळवला. ते आज ही या मतदार संघाचे च प्रतिनिधित्व करतायत.
गेली १५ वर्ष हा मतदार संघ आपल्याकडे नाही याची सल आजही अनेक भाजपा कार्यकर्त्या मध्ये आहे,मात्र यावेळी कोणत्याही स्थितीत ही जागा आपल्या वाट्याला आली पाहिजे म्हणून भाजप चे वरिष्ठ स्तरावरून ही जोरदार हालचाली सुरू आहेत, मध्यंतरी एका मेळाव्यातून इथे शिवसेना (शिंदे गट) कडून कुणबी समाजा ला प्रतिनिधित्व करायची संधी देऊ असे महायुती तीलच एक जबाबदार माजी मंत्री यांनी परस्पर जाहीर केल्याने गुहागर भाजपा समर्थाकमध्ये प्रचंड नाराजी उलटली पण संयमी असणाऱ्या नातू यांनी कोणतीही महायुती ला बाधक होईल अशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भाजपा चे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी यावर आपली नाराजी वरिष्ठ नेत्यांचे कानावर घातली आणि आता काही ही होऊ द्या हा मतदारसंघ या वेळी महायुती म्हणून आम्हालाच द्या आम्ही पुन्हा भाजप ला गत वैभव प्राप्त करून देऊ असे सांगितल्याचे समजते.
गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष हे सद्या महायुती चे मत्री व भाजपा चे वरीष्ठ नेते ना. रविंद्र चव्हाण, माजी आ. विनय जी नातू, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचे मार्गर्शनाखाली ते आपल्या कार्यकर्त्या सह विधानसभा क्षेत्रा मध्ये नव्या जुन्या कार्यकर्ते यांच्या गाठी भेटी घेत पुढची रणनीती ठरवत आहेत.
मात्र यावेळी होणारी गुहागर विधानसभा ही पुन्हा लक्ष वेधी होणार हे नक्की, ज्यावेळी विधान सभे च्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा च खरी रंगत येणार.. हे मात्र खर ..कारण या विघान सभा क्षेत्रात मनसे चे प्रमोद गांधी ही मोर्चे बांधणी करत आहेत तर महा विकास आघाडी कडून पून्हा आमदार भास्कर शेठ जाधव आणि मुलगा विक्रांत जाधव यांचा ही हा मतदार संघ आपल्या कडेच राहील यासाठी प्रयत्नात आहेत तर आमदारकी साठी इच्छुक असणारे राजेश बेंडल व माजी मंत्री रामदास भाई कदम यांच्या ही भूमिकेकडे इथल्या जाणकार राजकीय निरिक्षक , मतदार यांचे लक्ष लागून राहणार आहे.
मात्र निवडणूक कधी ही होऊ द्या गुहागर भाजप ने गाव – वाडी निहाय आपली तयारी पूर्ण करून ठेवली आहे. गाव भेट कार्यक्रमा तू मतदार यंचे पर्यन्त पोहचत आहेत म्हणूनच आज त्यांचे कार्यकर्ते बिनधास्त बोलतायत ” कहो दिलं से नातू फिर से “x
संपादक-सुजेंद्र सुर्वे, रत्नागिरी वार्ताहर – डिजिटल मिडिया बातमी पत्र.x
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ – गुहागर समन्वयक
मानव अधिकार व महिला बालकल्याण सदस्य – रत्नागिरी जिल्हा.