💥 मनसेचा कोपरखैरणे पालिका कार्यालयावर मोर्चा!
🚩 नागरी समस्यांनी हैराण नागरिक, अहील्याबाई होळकर माता-बाल रुग्णालय उद्घाटनाविना बंद
नवी मुंबई (मंगेश जाधव) – कोपरखैरणे परिसरातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरे जावे लागत असून त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (सोमवार) पालिका कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
स्थानिक प्रशासनाने उभारलेले अहील्याबाई होळकर माता-बाल रुग्णालय अद्याप उद्घाटनाअभावी बंद असल्याने गरोदर महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर खराब रस्ते, फुटपाथची दयनीय अवस्था, मलेरिया-डेंग्यूचा फैलाव, वाढती अतिक्रमणे, बेजबाबदार उद्यान व्यवस्थापन आणि रस्त्यावर पडून राहणारा कचरा या प्रश्नांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
या साऱ्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसेने पालिका प्रशासनाला दिला आहे.
🔖 हॅशटॅग्स :
#मनसे #नवीमुंबई #कोपरखैरणे #पालिका #मोर्चा #नागरीसमस्या #अहील्याबाईहोळकररुग्णालय















