माझा गाव आणि तालुका आर्थिक, विकासात्मक दृष्ट्या सक्षम करायचा आहे – प्रमोद गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माझा गाव आणि तालुका आर्थिक, विकासात्मक दृष्ट्या सक्षम करायचा आहे – प्रमोद गांधी

आबलोली (संदेश कदम)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे झाड हे कातळावर लावलेले असून हे झाड वर्षानुवर्ष टिकेल.या झाडाला फळे, फुले यायला उशीर लागेल. आपण सर्व कार्यकर्ते जशी मला साथ देतोय तशीच साथ देत रहा आपल्याला राज साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यायची असून मला माझा गाव आणि माझा तालुका आर्थिक, विकासात्मक दृष्ट्या सक्षम करायचा आहे असे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका विधानसभा संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी व्यक्त केले.

मनसेच्या वतीने शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुका मनसेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी पुढे म्हणाले की मनसेच्या कार्यकर्त्यांमुळेच मी गुहागर मध्ये सक्रिय झालो. मी माझ्या गुहागर तालुक्याची जबाबदारी पार पाडत असताना राज साहेबांचा आदेश शिरसंवाद मानून काम करीत आहे. माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते पक्षाचे काम निष्ठेने करत आहेत. पक्ष कामात ते सक्षम आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत हा चिंतेचा विषय असून कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा होईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार असून उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कोणकोणते उपक्रम राबवले जातील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत

माझ्या पाश्चात माझा वाढदिवस गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमाद्वारे कार्यकर्त्यांनी जे समाजकार्य केले आहे असे समाजकार्य करत रहा. लोकांच्या सुखदुःखात सामील व्हा आपल्या पक्षाला यश नक्कीच मिळेल असा विश्वासही प्रमोद गांधी यांनी व्यक्त करून कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जाणवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, उपाध्यक्ष तुषार शिरकर, जितेंद्र साळवी,गुहागर तालुका सचिव प्रशांत साठले, सागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर, कौंढर – काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, उपविभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर , विशाखा अध्यक्ष दीपक शिंदे, मुंढर शाखा अध्यक्ष सुचित गांधी आदी. मान्यवर महाराष्ट्र सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कोंडकारुळ विभाग उप तालुका अध्यक्षपदी प्रसाद विखारे तसेच कोंडकारुळ विभाग अध्यक्षपदी सचिन सैतवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्ती पत्र प्रमोद गांधी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात