अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण केल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल! सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा सरकारला कडक इशारा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण केल्यास रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल!
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा सरकारला कडक इशारा

नवीमुंबई (मंगेश जाधव):
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून जाती-जातींत फूट पाडण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. जर हा अन्यायकारक डाव तातडीने थांबवला नाही, तर “रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरेल”, असा थेट इशारा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) येथे झालेल्या जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, अनुसूचित जातींमध्ये फक्त बौद्ध, मातंग एवढ्याच नाहीत तर तब्बल ५९ जातींचा समावेश असून त्यांचे पोटजाती धरल्यास त्या जवळपास १२०० च्या घरात जातात. अशा परिस्थितीत वर्गीकरणातून एक टक्काही फायदा होत नाही. उलट शासन मतांवर डल्ला मारण्यासाठी भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे, असा त्यांचा आरोप होता.

ते पुढे म्हणाले, “खऱ्या अर्थाने समाजाचा विकास हवा असेल तर जातीनिहाय जनगणना करावी. मगच सरकारला प्रत्येक जातीची खरी लोकसंख्या व त्यांच्या विकासाच्या गरजा कळतील.”

या मेळाव्यात रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन कोकण विभाग सचिव मिलिंद जाधव यांनी केले. औचित्य साधून बाळकृष्ण जाधव यांची जिल्हाध्यक्ष आणि अनिल तांबे यांची जिल्हा प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली.

मेळाव्यात कोकण प्रदेश अध्यक्ष विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, खजिनदार महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अशोक कणगोलकर, जिल्हा प्रभारी प्रकाश करूळेकर, चिटणीस मिलिंद जाधव, सुरेश मंचेकर, गोपाळ जाधव, विकास गायकवाड, संतोष साळवी, प्रकाश कासे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संदेश गमरे यांच्यासह रत्नागिरी व लांजा तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

🔖 हॅशटॅग्स

#AnandrajAmbedkar #RepublicanSena #अनुसूचितजाती #सिंधुदुर्ग #वैभववाडी #RatnagiriNews #नवीमुंबईन्यूज #राजकारण #रत्नागिरीवार्ताहर

📸

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound