महाराष्ट्रात आता २४ तास दुकानं सुरु, शासन निर्णय लागू ! आता हॉटेल, दुकानं, सिनेमागृह २४ तास खुली
मुंबई: दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यातील हॉटेल, दुकाने, सिनेमागृह (मॉल), नाट्यगृह आणि इतर सर्व आस्थापनं आता 24 तास खुली ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. ‘नाईट लाईफ’ (Night Life) संकल्पनेला बळ देणारा हा निर्णय उद्योग विभागाने परिपत्रक जारी करत जाहीर केला आहे.
प्रमुख निर्णय काय आहेत?
- 24 तास खुले: आस्थापनांना आठवड्याचे सातही दिवस, 24 तास कार्यरत राहण्याची मुभा मिळाली आहे.
- उद्देश: यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- कर्मचारी सुट्ट्या: 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी असली तरी, प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सलग 24 तासांची साप्ताहिक सुट्टी देणं आस्थापनांना बंधनकारक असेल.
कोणाला वगळलं? (काय बंद राहणार)
परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलं आहे की, काही विशिष्ट आस्थापनांना 24 तास सुरू ठेवण्याच्या या नियमातून वगळण्यात आलं आहे. म्हणजेच, त्यांच्यासाठी सध्याचे वेळेचे नियमच लागू राहतील.
- बार
- वाइन शॉप
- हुक्का पार्लर
- देशी बार
- बार परमिट रूम
याचा अर्थ, मद्याची दुकानं (वाइन शॉप) आणि मद्यपानगृह (बार, परमिट रूम), तसेच हुक्का पार्लर यांना 24 तास सुरू ठेवता येणार नाही. नागरिकांमध्ये गोंधळ आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राजकारण आणि संकल्पना
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी ही ‘नाईट लाईफ’ची संकल्पना मांडली होती, ज्यावर तेव्हा भाजपने टीका केली होती. मात्र, आता भाजप सरकारनेच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
#Tags
#MaharashtraNightLife #24HoursOpen #MaharashtraNews #MumbaiLife #PuneNightLife #HotelCinemaOpen #EntertainmentMaharashtra #हुक्कापार्लर #बार #सीमोल्लंघन #महाराष्ट्रशासन #24तास















