आदर्श शाळा काजुर्ली नं. 2 येथे वाचन प्रेरणा दिन, योग शिबीर, शाळा तिथे दाखला अभियान उत्साहात साजरे
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजुर्ली नं.2 या शाळेत डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आबलोली महा इ सेवा केंद्राचे सर्वेसर्वा नरेश निमुणकर व आंतरराष्ट्रीय योग पटू श्री अनिल कालेकर उपस्थित होते. यावेळी श्री अनिल कालेकर यांनी विद्यार्थी यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले व योग शिबीर घेतले. तसेच शाळा तिथे दाखला अभियान अंतर्गत श्री नरेश निमुनकर यांच्या हस्ते विद्यार्थी यांना वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखल्याचे वाटप करण्यात आले. श्री नरेश निमुनकर यांनी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप केले व शाळेतील कॉम्पुटर सिस्टीम साठी कॉम्प्युटर टेबल चे वाटप केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन काकडे व शिक्षकवृंद व पालक यांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले. उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी मोहिते, उपाध्यक्ष ऋतुजा रेवाळे, आशाताई माधुरी डिंगणकर, मुख्याध्यापसर्व श्री. नितीन काकडे, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. काजुर्ली नं. 2 या शाळेत खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उठाव होतो व या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत ही अव्वल असतात हेच या शाळेचे विशेष वैशिष्ट्य आहे.















