हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव आहे का? सूषमा अंधारे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव आहे का? सूषमा अंधारे

हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव आहे का? सूषमा अंधारे.

..

नागपूर : ‘हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात आली नाही. कायद्याचा सन्मान राखला जावा, यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश देऊन संकेतवर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन शिवसेनेच्या (उबाठा) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. सुषमा अंधारे यांनी आज सकाळी अकरा वाजता सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट देऊन अपघाताबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर त्या प्रसारमाध्यामांशी बोलत होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) हे तिघेही रविवारी मध्यरात्री धरमपेठमधील लाहोरी रेस्ट्रॉरेंट आणि बारमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारू पिली

फिर्यादीची तक्रार घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ
सेंटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने जीतू सोनकांबळे याच्या कारसह तीन वाहनांना धडक दिली आणि पळून गेले. सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे सोनकांबळे यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, प्रसारमाध्यमांच्या दबावामुळे ही तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अर्जुन आणि रोनित या दोघांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. संकेतला सोडले. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सीताबर्डी पोलिसांवर दबाव टाकला, त्यामुळे संकेतला अटक करण्याची हिम्मत पोलिसांनी दाखवली नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

पहिल्या दिवशी ठाणेदार चंद्रशेखर चकाटे म्हणतात की, अपघात करणारी ऑडी कार कुणाची आहे, याबाबत माहिती नाही. त्यानंतर संकेत कारमध्ये नव्हताच. शेवटी सांगतात की, संकेतचे नाव एफआयआरमध्ये टाकण्याची गरज वाटली नाही. यावरून पोलिसांवर किती दबाव असेल, याची कल्पना येते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

वैद्यकीय तपासणी का नाही?
ऑडी कार अर्जुन चालवत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा दावा पोलीस उपायुक्त मदने करतात. मग रोनित चिंतमवार याची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली? तोच कायदा संकेतलासुद्धा लागू होतो. मग संकेतची वैद्यकीय चाचणी करण्यात का आली नाही? अर्जुन, संकेत आणि रोनित हे तिघेही कारमध्ये होते, तर एफआयआरमध्ये फक्त दोघांची नावे नोंदवण्यात आली, संकेतचे नाव का टाकले नाही?, असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी पोलिसांना विचारले.

चंद्रशेखर बावनकुळेंचा पोलिसांवर दबाव?
‘हिट अँड रन’च्या घटनेला चोवीस तास उलटल्यांतरही सीताबर्डी पोलिसांना ऑडी कारच्या मालकाची माहिती मिळाली नव्हती. परंतु, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा तासांतच ऑडी कार मुलगा संकेतची असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे पोलिसांपेक्षाही अपडेट आहेत. तसेच निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले होते. मग स्वतःच्या मुलाचे नाव एफआयआरमध्ये न टाकण्यासाठी पोलिसांवर दबाव का आणला?, असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

नागपूर हिट अँड रन प्रकरणात सुषमा अंधारे आणि खा. संजय राऊत यानी आपली विरोधी भूमिका मांडली आहे त्यामूळे गृह विभाग च संशयाच्या भोवऱ्यात आहे का? अशी शंका आता सामान्य जनतेला पडली आहे.

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के