स्वच्छ भारत योजनेत भ्रष्टाचाराचा वास जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये अजूनही कायम — अधिकारी बदलले, वृत्ती नाही!”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छ भारत योजनेत भ्रष्टाचाराचा वास जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये अजूनही कायम — अधिकारी बदलले, वृत्ती नाही!”

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

दि ५ मे २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय घोटाळा प्रकरणावरील तक्रारीवर जिल्हापरिषद रत्नागिरी मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी निर्णय देऊन अहवाल तक्रारदार तसेच संबंधित कक्ष अधिकारी विभागीय आयुक्त हया विभागांना पाठवला होता. ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती वैदही रानडे यांच्या नावाने सादर करण्यात आली होती.

तक्रारदार श्री. निलेश वि रहाटे (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार) यांनी परीक्षित यादव यांनी दिलेला अहवाल भ्रामक अपूर्ण आणि पुरावे पाहून सुद्धा माहितीवर आधारित नसल्याचा आरोप केला आहे व त्यावर आक्षेप घेतला आहे तसेच, सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम वैदही रानडे यांना अंधारात ठेवून अहवाल सादर करण्यात आला का? हयांची चौकशी करण्यात यावी असा दावा आपल्या तक्रारीत केला होता.

त्यानुसार, संबंधित प्रकरणाची पुनर्तक्रार जिल्हा परिषद रत्नागिरी व विभागीय आयुक्त (आस्थापना) कोकण विभाग, नवी मुंबई येथे करण्यात आली होती.

यानंतर अपर आयुक्त (आस्थापना) मीनल कुटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांना केलेल्या तक्रारी वर “स्वतः लक्ष घालून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल कार्यालय मध्ये सादर करण्यात यावा” असा १०जुलै २०२५ रोजी निर्देश करणारा पत्रव्यवहार जिल्हा परिषद रत्नागिरी मध्ये केला होता

मात्र ऑक्टोबर २०२५ मध्ये RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीप्रमाणे, १०जुलै २०२५ रोजी पत्र पाठवूनही जिल्हा परिषदेकडून अहवाल प्राप्त झाला नाही असे समजते.

यापूर्वीही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी या भ्रष्टाचार प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले होते व वरिष्ठ हयांच्या पत्राला सुद्धा अश्याच प्रकारे दुर्लक्ष करत आले होते. आता सध्याच्या प्रशासनाकडूनही त्याच पद्धतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत नक्की हे नागरिकांच्या तक्रारी चे निकारण करण्यासाठी बसले आहेत की भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजून मोठे करण्यासाठी बसले आहेत संबंधित झालेल्या शौचालय घोटाळ्यामध्ये सामान्य लोकांचे खाल्लेले पचवायची काम यापूर्वी रत्नागिरी CEO यांनी केली होती व आता सुद्धा नवीन CEO करत आहेत का?

विभागीय आयुक्त कार्यालयाचे निर्देश पाळले जात नसतील, तर जबाबदारी नकी कोणाची हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला