खडकवासला-स्वारगेट-खराडी दरम्यानच्या मार्गावर मेट्रो धावणार
पुणे : खडकवासला-स्वारगेट-खराडी दरम्यानच्या मेट्रोला अंतिम मान्यता मिळून ते काम केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा केली जात असतानाच, या मार्गावर पूर्णत: स्वयंचलित पद्धतीने मेट्रोचे संचलन केले जाण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) त्यासाठी सविस्तर अहवाल तयार करून घेतला जाणार असून, या मार्गावर धावणाऱ्या २५ ट्रेन ‘लोकोपायलट’शिवाय अत्याधुनिक यंत्रणेद्वारे संचलित केल्या जाण्याची शक्यता आहे.’
[. महामेट्रो’कडून सध्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्यांची कामे सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानचे काम वेगाने सुरू आहे, तर इतर मार्गांवरील कामे निविदा प्रक्रियेमध्ये आहेत. ‘महामेट्रो’च्या प्रस्तावित मार्गिकांपैकी सर्वाधिक लांबीच्या खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी मार्गावर नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. ‘महामेट्रो’कडून त्यासाठीचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर नव्या ट्रेनसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.














