💥 खेड तालुक्यात शिंदे गटाला मोठा धक्का! 💥
धामणदेवी जि.प. गटातील आंजणी-ढाकरवाडीतील पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षात जाहीर प्रवेश
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिंदे गटाला (शिवसेना) मोठा धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी-ढाकरवाडी येथील शिंदे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिलांनी आज सन्शिमानीय आमदार भास्वकर शेठ जाधव आणि जिल्सेहाध्नायक्ष विक्रात्न जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश आमदार भास्कर शेठ जाध, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव आणि पक्षप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला. शिंदे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि अनेक ग्रामस्थांनी हातात शिवबंधन बांधल्याने खेड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख श्री. पप्पू आंब्रे, तालुका प्रमुख श्री. अंकुश काते, तालुका सचिव श्री. संदीप कदम, विभाग प्रमुख राजेंद्र घाग, उप विभाग प्रमुख नंदू कांबळे, शाखाप्रमुख सुनील घाणेकर, वहाब सेन, दिनेश शिरीषकर, निळीक शाखाप्रमुख मुजफर देसाई, सरपंच संतोष कान्हेरे, उपशाखाप्रमुख सुभाष जाधव, संतोष हरमले, अरविंद जावळे, शंकरदादा लंबाडे, संतोष बंदरकर, मेटे गावचे सरपंच श्री. जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा प्रवेश आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.















