समाज सेवेचे ध्यास असलेले समाज सेवक श्री. अनंत सिताराम शेमणकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त कार्य अहवालावर प्रकाश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाज सेवेचे ध्यास असलेले समाज सेवक श्री. अनंत सिताराम शेमणकर यांच्या
अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त कार्य अहवालावर प्रकाश

संदीप शेमणकर

दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२५ रोजी.
राजापूर तालुक्यातील मौजे मोगरे राजवाडी गावचे सुपुत्र श्री. अनंत सिताराम शेमणकर उर्फ अप्पा माजी सरपंच ग्रामपंचायत मोगरे व तंटामुक्त गाव समिती मोगरेचे कार्यक्षम अध्यक्ष, तसेच हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्यक्ष आशीर्वाद दिलेले व मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मोगरे हि पूर्वी मोगरे राजवाडी परिसरातील, वाडा भराडे या गावामधील श्री. लक्ष्मीनारायण मंदिरच्या नगरखाण्या मध्ये सुरु असताना पासूनचा शाळेचा विदयार्थी, शाळेचे संस्कार व चांगले सुसंस्कारित शिक्षण घेऊन लहानाचा मोठा झालेला, एक लोकमान्य माजी विदयार्थी, लोकप्रिय, निस्वार्थी व सामाजिक कार्यकर्ते, हे शुक्रवार दिनांक ०७/११/२०२५ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करून, ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या निमित्त त्याच्या कार्य अहवालावर प्रकाश
श्री. अनंत सिताराम शेमणकर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य
मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४ (२) मध्ये सुधारणा करणारा कायद्याचा नवीन मसुदा तयार केला. आणि कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई (आडिवरे-कशेळी-गावखडी) मार्फत मा. महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सादर केला. त्यांनी त्यामध्ये आणखी काही अटी घालून तो मंजूर केला.
मा. महसूलमंत्री यांनी मंजूर केलेल्या कायद्याचा सुधारित नवीन मसुदा मधील जाचक अटींची पूर्तता करणे, अर्जदार कुळांना अत्यंत त्रासदायक आणि खर्चिक होत होते. त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याचा नवीन सुधारित मसुदा तयार करून तो कुणबी समाज सेवा मंडळ, मुंबई मार्फत मा. ना. श्री सुधीरभाऊ जोशी, महसूलमंत्री यांच्याकडे सादर केला. त्यावर झालेल्या बैठकीमध्ये राजापूरचे शिवसेनेचे आमदार मा. श्री. अप्पा साळवी साहेब यांनी सदर मसुदा मंजूर करण्यास कडाडून विरोध दर्शविला.
मा. ना. श्री. नारायणराव राणे साहेब, महसूलमंत्री झालेवर सदर मसुदा पुन्हा त्यांच्याकडे सादर केला. आणि मा. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ठाणे-रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) या संस्थेचे पदाधिकारी यांच्या मार्फत कायद्याचा सदर सुधारित मसुदा मा. ना. श्री नारायणराव राणे साहेब महसूलमंत्री यांच्याकडून जसाच्या तसा मंजूर करून घेतला.
मा. ना. श्री. वसंतदादा पाटील साहेब, मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून “कुळ कायदा अभ्यास समिती स्थापन करून घेतली.” समितीचे अध्यक्ष मा. बॅरिस्टर शरद पालव साहेब यांची बेदखल कुळांच्या प्रश्नानांसंदर्भात ३ ते ४ वेळा प्रत्यक्षात भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कुळ कायदा अभ्यास समितीने मौजे मोगरे गावाला भेट दिली. व कुळांचे प्रश्न त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. आणि त्या मा. मुख्यमंत्री यांच्यापुढे सादर करण्याचे आश्वासन दिले.
मा. श्री. रा. वि. भुस्कुटे साहेब, माजी तहसीलदार राहणार कल्याण कुळ कायद्याचे गाढे अभ्यासक व लेखक यांना बेदखल कुळांच्या प्रश्नासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मा. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ठाणे-रायगड रत्नागिरी-सिंधुदुर्ग) या संस्थेच्या कार्यालयात दोन वेळा विना मोबदला पाचारण केले होते.
मौजे मोगरे या एकमेव महसुली गावासाठी ‘स्वतंत्र ग्रामपंचायत मोगरे”, मंजूर करून घेतली.
तंटामुक्त गाव समिती मोगरेचे अध्यक्ष असताना, मा. तहसीलदार राजापूर यांच्याकडील मीजे मोगरे येथील ७० व च्या दाखल दाव्यांपैकी ५ दावे तंटामुक्त गाव समिती, मोगरेकडे वर्ग करून घेतले. आणि ते तहसीलदार कोर्टाप्रमाणेच कायद्याच्या कक्षेतच चालवले व अर्जदार कुळ असल्याचे घोषित केले. सदर आदेश मा. तहसीलदार राजापूर यांनी जसेच्या तसे मंजूर केले व ७/१२ सदरी इतर हक्कात कुळांची नावे दाखल करण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या अधिसूचनेनुसार कुणबी, चव्हाण, सुतार व भंडारी ज्ञाती समाजातील एकूण ९० कुळांच्या घराखालील घरभाट व घरपरसव जमिनींना त्यांची नावे कुळ म्हणून दाखल करण्याबाबतचे अर्ज व पुराव्याची कागदपत्र स्वतः तयार करून, तलाठी सजा-राजवाडी मार्फत मा. तहसीलदार, राजापूर यांच्याकडे सादर केली असताना मा. तहसीलदार राजापूर यांनी सर्व अर्ज मंजूर करून अर्जदार कुळांची नावे 7/12 सदी इतर हक्कात कुळ म्हणून दाखल करून घेण्याचे आदेश दिले.
सर्व ज्ञाती समाजातील गोर गरीब कुळांचे ७० व चे कुळ वहिवाट दावे, तसेच घरभाट व घरपरसव जमीनेचे १७ ब, 32 ग, 32 ओ चे जमीन विक्रीचे दावे, प्रतिज्ञापत्रे, जाबजबाव, अर्ज इत्यादी निस्वार्थीपणे, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वखचनि तयार करून ते मा. तहसीलदार, राजापूर यांच्याकडे सादर करण्यास कुळांना मदत केली व आजही करीत आहेत. धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र, मा. श्री. आमदार ल. र. हातणकर साहेब व मा. कुणबी समाज सेवा मंडळ, मुंबई मार्फत धारतळे येथे मंजूर करून घेतले आणि त्यासाठीची जमीन, मा .श्री. बाळकृष्ण जानू ठूकरुल मंडळाचे सचिव राह. सावरेवाडी कशेळी यांनी जमीन मालक व त्यांचे मित्र, राहणार भालावली यांच्याकडून विना मोबदला बक्षिस पत्रान्वये मोफत मिळवून दिली.
आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय निधी मंजूर करून दिला. आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्टर व एक रुग्णवाहिका मंजूर करून घेतली. आणि विद्युत जोडणी करून घेऊन लाईटची सुविधा आणि पक्की विहीर मंजूर करून घेऊन, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच आडिवरे येथील MSEB चे कार्यालय धारतळे येथे सुरु करून घेतले.
जि. प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, मोगरे आणि अंगणवाडी शाळेसाठी जमीन मालक श्री. रमेश शंकर नाईक व मीनाक्षी शंकर नाईक यांच्याकडून ८ गुंठे जमीन विनामोबदला बक्षीस पत्राने मोफत मिळवून दिली. तसेच मौजे पाणेरे गावासाठी एक शिक्षकी शाळा मंजूर करून घेतली.
जि. प. पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मोगरेच्या इमारती पर्यंत विद्युत पोल टाकून व विद्युत वाहिनीची जोडणी करून घेऊन, शाळेला विद्युत पुरवठा सुरू करून दिला. शाळे शेजारील श्री. चव्हाण बंधू यांच्या विहिरीवरून पंपाने पाणी घेऊन पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शाळेसाठी नवीन रूम मंजूर करून घेतले. इयत्ता। ली ते 7 वी मधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने एकूण ५ शिक्षकांपैकी फक्त ३ शिक्षक मंजूर करण्यात आले, त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेउन ४ थ्या शिक्षकाची नियुक्ती करून घेतली. तसेच मोगरे शाळेसाठी ईयत्ता आठवीचा वर्ग मंजूर करून घेतला आहे, पण विद्याथ्यांची पट संख्या कमी असल्यामुळे तो बंद आहे.
मोगरे गावातील, देणवाडी, शेमणकरवाडी, भंडारवाडी व सडे मोगरे ते श्री. भद्रकाली देवी आई मंदिर पर्यंत विद्युत पोल टाकून विद्युत वहिनींची जोडणी करून घेतली व विद्युत पुरवठा सुरु करून दिला.
मोगरे, पाणेरे, भराडे, राजवाडी, कांगापूर, गाउडवाडी व तिवरे या वाड्यांसाठी स्वतंत्र लाईनमन (वायरमन) श्री. राजन हळदणकर राहणार तिवरे यांची नियुक्ती मंजूर करून घेतली.
१) धाऊलवल्ली फाटा ते पाणेरे 2) भराडे फाटा-राजवाडी ते नाटे ३) राजवाडी ते तिवरे ४) धारतळे-मोगरे-राजवाडी ५) शिवगणवाडी-सडे मोगरे-श्री भद्रकाली मंदिर ६) शिगवणवाडी ते शेमनकरवाडी ७) पाणेरे ते धारळीवाडी व ८) मोगरे-निवई-पाणेरे इत्यादी रस्ते मंजूर करून घेतले.
१) भराडेवाडी जवळ साकव २) भराडे शाळेजवळ लोखंडी साकव व पक्का पूल ३) राजवाडी पोस्ट ऑफिस जवळ कॉजवे ४) धारळी वाडी येथे पूल ५) शिगवणवाडी येथे पूल ६) शिवलकरवाडी येथे पूल ७) भंडारवाडी येथे पक्का साकव ८) शेमणकरवाडी येथे कॉजवे मंजूर करून घेतले.
गाऊडवाडी, पाणेरे देणवाडी, शिवगणवाडी, भंडारवाडी, शिवलकरवाडी, सडे मोगरे, धारळी वाडी करीता पिण्याच्या पाण्याच्या पक्क्या विहिरी, बोअरवेल्स मंजूर करून घेतल्या. तसेच वहाळावरील धरण बंधारे व पाण्याच्या पाटांची दुरुस्ती करून पाटाद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली इत्यादी कामे केली.
श्री. अनंत सिताराम शेमणकर यांनी खालील संस्थांमध्ये मानाच्या पदांवर काम केले आहे
ग्रामपंचायत मोगरे, सरपंच
तंटामुक्त गाव समिती मोगरे (कार्यक्षम अध्यक्ष)- अध्यक्ष
विशेष कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई – SEM
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (रजि.) – सदस्य
कुणबी समाज सेवा मंडळ, मुंबई (रजि.), (ग्रामीण)- अध्यक्ष, संघटक व मार्गदर्शक
मोगरे विकास मंडळ, मुंबई – संस्थापक व प्रमुख कार्यवाह
माजी विद्यार्थी संघ, मुंबई (मोगरे-पाणेरे) : संस्थापक व कार्याध्यक्ष
राजवाडी परिसर विकास मंडळ, मुंबई (रजि.) : संस्थापक व प्रमुख कार्यवाह
मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे : निष्टावंत शिवसैनिक
अशा या लोकप्रिय निस्वार्थी, सामाजिक कार्यकर्त्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२५रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता साजरा करीत आहोत आपण सदरकार्यक्रमाला उपस्थित राहून श्री. अनंत सीताराम शेमणकर यांना आपले बहुमूल्य आशिर्वाद, व पुढील कार्यकाल सुखाचा, समाधानाचा व आरोग्यदायी जावा. म्हणून हार्दिक शुभेच्छा द्याव्यात हि नम्र विनंती.
आपले नम्र
चंद्रकांत अनंत शेमणकर सुनील तानाजी शेमणकर
सुनंदा अनंत शेमणकर सुगंधा चंद्रकांत शेमणकर
श्रुतिका चंद्रकांत शेमणकर अथर्व चंद्रकांत शेमणकर
रविंद्र रामचंद्र नागले
रश्मी रवींद्र नागले
बाळकृष्ण पांडुरंग शेमणकर

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार