नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर — बदलणार राजकीय समीकरणे!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिक महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर — बदलणार राजकीय समीकरणे!

नाशिक (गुरुदत्त वाकदेकर) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिकमधील कालिदास कला मंदिर येथे पार पडली. या सोडतीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक डॉ. मनिषा खत्री तसेच उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते. या प्रक्रियेत पारदर्शक ड्रमचा वापर करण्यात आला आणि लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या पारदर्शक आणि न्याय्य सोडतीदरम्यान नाशिक महानगरपालिकेतील एकूण ३१ प्रभागांपैकी काही प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.

पंचवटी विभागात — प्रभाग क्र. १ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती, ओबीसी (महिला) आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. २ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ३ मध्ये ओबीसी (महिला), सर्वसाधारण (महिला) आणि दोन सर्वसाधारण; प्रभाग क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ५ मध्ये ओबीसी, दोन सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण; प्रभाग क्र. ६ मध्ये अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी, सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे. पश्चिम विभागात — प्रभाग क्र. ७, १२ आणि १३ मध्ये अनुक्रमे ओबीसी, सर्वसाधारण (महिला), अनुसूचित जाती आणि ओबीसी (महिला) असे आरक्षण लागू झाले आहे.

सातपूर विभागात — प्रभाग क्र. ८ ते ११ आणि २६ या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण या प्रवर्गांनुसार आरक्षण ठरले आहे. पूर्व विभागातील प्रभाग क्र. १४, १५, १६, २३ आणि ३० मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. नाशिकरोड विभागात — प्रभाग क्र. १७ ते २२ दरम्यान विविध ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. सिडको विभागात — प्रभाग क्र. २४ ते ३१ मध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण या प्रवर्गांनुसार प्रभाग राखीव ठरले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षण प्रक्रियेचे टप्पे पुढीलप्रमाणे पार पडतील — ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून ती आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आली. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली, तर ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सोडत काढून निकाल आयोगास सादर करण्यात आला. १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध होऊन हरकती व सूचना मागविण्यात येतील. २४ नोव्हेंबर हा हरकती व सूचनांचा अंतिम दिनांक असेल. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत मनपा आयुक्त प्राप्त हरकतींवर विचार करून निर्णय घेतील, तर २ डिसेंबर २०२५ रोजी आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

या सोडतीनंतर संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रभागांत आरक्षणामुळे निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महिला आरक्षणामुळे शहरात नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळणार असून, येणारी निवडणूक नाशिकच्या राजकीय भवितव्यास निर्णायक ठरण्याची शक्यता नागरिक आणि राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात