रत्नागिरी नगर परिषद निवडणूक; नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी
======———-======
रत्नागिरी :- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशीरा हा निर्णय जाहीर झाला.
रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे शिवसेना उमेदवारांबाबतची सुरू असलेली चर्चा, अंदाज-तर्कवितर्क याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
उमेदवारी जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिल्पा सुर्वे यांचे फुलांच्या हारांनी, जल्लोषात अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शिल्पा सुर्वे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठी कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.















