कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय? ~ अतुल नाना मानेपाटील संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कारखान्यांची धुराडी पेटली, पण दराचं काय?

~ अतुल नाना मानेपाटील

संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ

 

अहिल्यानगर, जिल्हा प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील

राज्यातील साखर कारखाने सुरु होऊन जवळपास महिनाभर झाला असतानाही सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखानदारांनी अद्याप उसाचा दर जाहीर केलेला नाही. कारखान्यांच्या धुराड्या धगधगत आहेत, उसाला कोयते चालले आहेत; पण शेतकऱ्याच्या मेहनतीचा दर मात्र अजूनही हवेतच आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३९ साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत सरांचा राजवी अॅग्रो शुगर कारखाना हा अपवाद ठरला असून त्यांनी उसाचा दर ३००१ रुपये प्रति टन जाहीर केला आहे. मात्र उर्वरित एकाही कारखान्याने दर जाहीर करण्याचा धाडस केलेले नाही. दराबाबत शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांची मागणी होत असताना कारखान्यांनी मात्र हातावर हात ठेवून गप्पी साधली आहे.

 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टी आणि पुरामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. कुणाची पिके वाहून गेली, कुणाची जमीनच नुसती उध्वस्त झाली. जे थोडेफार पिक उरले आहे त्यातही शंभर अडचणी. अशा वेळी दर न जाहीर करता कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या उसाला कोयते तर चालले, पण मनात मात्र दराबाबत काळोखच आहे.

 

याउलट कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातील साखर कारखानदारांनी उसाचे दर जाहीर केले आहेत. या जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी ३५०० ते ३६०० रुपये इतके दर ठरवले आहेत. मग सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना दर जाहीर करण्यात नेमकी अडचण काय, असा प्रश्न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

 

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना विचारणा झाली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,

 

> “कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या दरासाठी एकजुटीने उभे राहतात. त्यामुळे तेथील कारखानदारांना नमतं घ्यावंच लागतं. पण सोलापूर जिल्ह्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची अशी एकजूट नाही. म्हणूनच तेथील कारखानदार चांगला दर देत नाहीत, याचा फटका थेट शेतकऱ्यांनाच बसतो.”

खरं तर साखर कारखाने ही शेतकऱ्यांची नव्हे तर कारखानदारांची “सोन्याचं अंड देणारी कोंबडी” मानली जाते. कारण, कारखान्यातून केवळ साखरच विकली जात नाही, तर

वीज निर्मिती,इथेनॉल,मोलॅसिस,मळी,भुसा

अशी अनेक उत्पादने विक्रीला जातात आणि त्यातून प्रचंड महसूल कारखानदारांच्या हाती जमा होतो. मग असे असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना कोल्हापूर–सांगलीप्रमाणे दर देण्यास नेमकी अडचण काय, असा सवाल निर्माण होतो.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस हेच महत्वाचं पीक. ऊस शेतीवर हजारो कुटुंबांचा प्रपंच उभा आहे. या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे आधीच उद्ध्वस्त झाला. एका बाजूला आस्मानी संकट, आणि दुसऱ्या बाजूला दर न जाहीर केल्याने सुलतानी संकट – अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. कारखानदार मात्र शांतपणे धुराड्या पेटवून शेतकऱ्यांची “मजा” बघतायत, अशी भावना ऊस उत्पादकांत तीव्र होत आहे.

 

अशा परिस्थितीत आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त होत आहे.

कारखानदारांना जाब विचारणे,

आपल्या हक्काचा योग्य दर मागणे,

आणि राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभे राहणे,

यातूनच शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडू शकतील; अन्यथा कारखानदार कमी दरात शेतकऱ्यांना गुंडाळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पडद्यामागे बहुतांश कारखानदार एकाच सूत्रावर चालतात आणि “ठरलेल्या रेषेपलीकडे दर वाढवायचा नाही” असा मौन करार करूनच कारखाने सुरू केले जातात, असा आरोपही होत आहे.

कारखान्यांची धुराडी पेटली, पण उसाच्या दराचे काय? हा सवाल विचारत ऊस उत्पादकांनी एकजूट होऊन लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात