मतदारांच्या अग्रस्थानी राहून निवडणूक लढवणारे समाजधडाडीचे नेते राजेंद्र कुटे मैदानात’

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘मतदारांच्या अग्रस्थानी राहून निवडणूक लढवणारे समाजधडाडीचे नेते राजेंद्र कुटे मैदानात’

श्रीगोंदा : नंदकुमार बगाडे पाटील,
नगरपालिका निवडणुकीत “पहिले समाजसेवा… मग राजकारण” असा वेगळा लौकिक निर्माण केलेले नाभिक समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कुटे आता अधिकृतपणे रिंगणात उतरले आहेत. मतदारांच्या सततच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, श्रीगोंदा शहरात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अतिशय साध्या, सामान्य कुटुंबातून आलेले राजेंद्र कुटे हे अष्टपैलू वकृत्व, अभ्यासू दृष्टिकोन आणि लोकांशी जिव्हाळ्याचा संपर्क यामुळे वेगळे ठरतात. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. राजकारणापेक्षा ९० टक्के वेळ समाजकार्यासाठी देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख पक्की झाली आहे.

संघर्षमय जीवनातून त्यांनी केवळ श्रीगोंदा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडणे, अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवणे आणि गरजूंपर्यंत शासकीय योजनांचे प्रत्यक्ष फायदे पोहोचवणे, असे अनेक वेधक उपक्रम त्यांनी सातत्याने केले आहेत.

श्रीगोंदा नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विविध प्रभागांतील पाणी, रस्ते, स्वच्छता, महामार्ग, आरोग्य, शिक्षण अशा प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे “मतदारांच्या मनातील नगरसेवक” अशी त्यांची ओळख आधीच तयार झाली असून, अधिकृत निवडणूक लढण्यापूर्वीच ते घराघरात परिचित झाले आहेत.

सत्ता पक्ष असो की विरोधक, अनेकांनी राजेंद्र कुटेंच्या वाढत्या लोकप्रियतेवर राजकीय डाव मांडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तरीसुद्धा सामान्य मतदारांच्या मनातील “राजेंद्र भाऊ” ही त्यांची ओळख अजून घट्ट झाली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना प्रेमाने राजेंद्र भाऊ या नावाने संबोधतात.

श्रीमंत–गरीब असा कुठलाही भेदभाव न करता, सर्वांना सारखा न्याय मिळावा ही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. संघर्षातून मिळवलेले यशच खरे, आणि तोच खरा सामाजिक कार्यकर्ता, असा त्यांचा जीवनविचार आहे. त्यामुळेच त्यांनी केलेल्या कार्यामुळे नाभिक समाजासहित इतर समाजघटकांमध्येही त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे.

त्यांच्या सोबत अनेक उत्साही युवा सामाजिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी खंबीरपणे उभी आहे. पक्षीय राजकारणापेक्षा समाजकार्यातून स्वतःची ओळख निर्माण केलेला अपक्ष उमेदवार म्हणून राजेंद्र कुटे यांची एंट्री ही सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंच्या उमेदवारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मतदारांच्या प्रतिक्रिया, बैठका, गल्ली पातळीवरील चर्चांमधून “यावेळी समाजकार्यातून उभा राहिलेला उमेदवार पुढे आणायचा” असा सुर स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्यामुळे या अपक्ष उमेदवारीचा निकालावर किती परिणाम होतो, याकडे संपूर्ण श्रीगोंदा शहराचे लक्ष लागले आहे.

घोडा मैदानात उतरला आहे… आता जनता कोणाला विजयी करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 🗳️

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला