राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ :
‘मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही’
रत्नागिरी : माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
शपथेत त्यांनी –
> “मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन.
मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच, सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गार्हाणे शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.”
या वेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















