गुहागर एस. टी.डेपो, गुहागर आगार येथे प्रवाशांसाठी आता सेल्फी पॉईंटची सोय
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुहागर एस. टी.डेपो, गुहागर आगार येथे प्रवाशांना आणि पर्यटकांना एस. टी. बस कडे आकर्षीत करण्यासाठी खास सेल्फी पॉईंटची सोय करण्यात आली असून सेल्फी काढण्यासाठी प्रवाशी आणि पर्यटकांची गर्दी होत आहे.
हा आकर्षक सेल्फी पॉईंट बनवीण्यासाठी गुहागर आगार मधील कर्मचारी एस. आर. जाधव,ए. डी. काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले या कामी गुहागर एस. टी.डेपोचे आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण यांचेसह सर्व अधिकारी, कार्यशाळेतील अधिकारी यांनी मौलिक मार्गदर्शन केले असल्याची माहिती गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.















