भाकर फाऊंडेशन तर्फे बाल सभेतील सदस्यांची गोरेगाव अग्निशमन केंद्राला शैक्षणिक भेट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाकर फाऊंडेशन तर्फे बाल सभेतील सदस्यांची गोरेगाव अग्निशमन केंद्राला शैक्षणिक भेट

नवी मुंबई (प्रतिनिधी : मंगेश जाधव)

बाल अधिकार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भाकर फाऊंडेशन तर्फे बाल सभेतील सदस्यांसाठी गोरेगाव अग्निशमन केंद्राला शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान गोरेगाव अग्निशमन केंद्रातील प्रमुख अधिकारी संतोष इंगोले आणि अंकुश सर यांनी मुलांशी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत मार्गदर्शन केले.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी अग्निशमन दल कसे काम करते, अग्निशमन गाड्यांची रचना, वापरातील साहित्य, तसेच कार्यालयीन कामकाजाची पद्धत याबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती दिली.

मुलं घरात एकटी असताना शॉर्टसर्किट किंवा आग लागल्यास स्वतःचा बचाव कसा करावा, तात्काळ कोणते उपाय करावेत याबाबत साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. धूर किंवा आग दिसताच तात्काळ बाहेर पडणे, ओल्या कापडाने नाक-तोंड झाकणे, शांत राहून मदत मागणे या महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांनी अधोरेखित केल्या. अग्निशमन दलाचा टोल फ्री नंबर मुलांना सांगून त्या क्रमांकावर मदत कशी मागायची याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

घराबाहेर जाताना “पा-ग-ल” म्हणजे पाणी – गॅस – लाईट बंद करून जाण्याचा छोटा आणि लक्षात राहणारा शॉर्टकट शब्द अधिकाऱ्यांनी मुलांना सांगितला. हा अनोखा उपाय मुलांना विशेष आवडल्याने त्यांनी लगेच तो आत्मसात केला.

झोपडपट्टी परिसरात आग लागल्यावर कसे वातावरण निर्माण होते, लोकांची धावपळ, धूर पसरल्यावर होणारी भिती अशा अनुभवांविषयी मुलांनीही उत्स्फूर्तपणे मोकळेपणाने मते मांडली. त्यानंतर मुलांनी अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारले असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी मुलांच्या भाषेत, सोप्या आणि समजेल अशा शैलीत दिले.

अग्निशमन दलासारख्या संकटाच्या काळात जीव वाचवणाऱ्या यंत्रणेसोबत संवाद साधणे आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेणे, हे मुलांच्या ‘माहिती मिळवण्याच्या अधिकाराचा’ (संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिलेला) एक महत्त्वाचा भाग आहे. या शैक्षणिक भेटीमुळे ज्ञान, सुरक्षा आणि जागरूकतेचे अमूल्य संचित मुलांना लाभले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास भाकर फाऊंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे, मंगला कुमठे, जाहिदा शेख, अजय भालेराव, कस्तुरी शाहू, श्लोक गुप्ता यांच्यासह भाकर फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि सर्व बाल सभेचे सदस्य उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound