सत्यनिष्ठा से…” बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी; 10 व्यांदा मुख्यमंत्री बनत रचला नवा विक्रम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सत्यनिष्ठा से…” बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी; 10 व्यांदा मुख्यमंत्री बनत रचला नवा विक्रम

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए-भाजप आघाडीला एकतर्फी यश मिळाले असून २४३ पैकी तब्बल २०२ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने जोरदार मुकाबला केला. मात्र, निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत “मोठा भाऊ” ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

अखेर बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनीच शपथ घेतली. पाटणा येथील गांधी मैदानावर मोठ्या जल्लोषात आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी यांनी मंचावर येऊन नितीश कुमार यांचे प्रत्यक्ष येऊन अभिनंदन केले.

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची दहाव्या वेळेस शपथ घेऊन सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते असा नवा विक्रम रचला आहे.

विधानसभा निकालाचा चित्रपट

या निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांनी प्रत्येकी १०२ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजपने ८९ तर जदयूने ८५ जागांवर विजय मिळवला. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला १९ जागा जिंकता आल्या. अशा प्रकारे २०२ जागांसह एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याच वाट्याला आले. महाराष्ट्रातल्या राजकारणाची तुलना करत “इथेही महाराष्ट्र पॅटर्न राबवला जाणार का?” अशी चर्चा रंगत असतानाच अखेर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

बिहारमधील मंत्रिमंडळाची यादी

नव्या मंत्रिमंडळात पुढील मंत्र्यांचा समावेश आहे :

सम्राट चौधरी

विजय कुमार सिन्हा

विजय कुमार चौधरी

बिजेंद्र प्रसाद यादव

श्रवण कुमार

मंगल पांडेय

डॉ. दिलीप जायसवाल

अशोक चौधरी

लेसी सिंह

मदन सहनी

नितिन नवीन

रामकृपाल यादव

संतोष कुमार सुमन

सुनील कुमार

मो. जमा खान

संजय सिंह टायगर

अरुण शंकर प्रसाद

सुरेंद्र मेहता

नारायण प्रसाद

रमा निषाद

लखेंद्र कुमार रोशन

श्रेयसी सिंह

डॉ. प्रमोद कुमार

संजय कुमार

संजय कुमार सिंह

दीपक प्रकाश

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात