“शिव प्रभा”या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव “राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत”

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“शिव प्रभा”या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव “राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत”

आबलोली (संदेश कदम)
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव कामगीरी करुन गेली अनेक वर्ष ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक आणि सामाजिक विकास व्हावा यासाठी सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले आणि वडील दिवंगत शिवराम पांडूरंग जाधव,आई दिवंगत प्रभावती शिवराम जाधव या आई – वडिलांनी दिलेल्या समाजसेवेचा वसा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात स्वत: ला झोकून देऊन निस्वार्थ पणे तन मन धन अर्पण करणारे गुहागर तालुक्यातील कुडली गावचे सुपूत्र आणि “शिव प्रभा”या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव यांना ” राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
“राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ हा पुरस्कार वेब पोर्टल आणि युटूब चॅनलच्या” ,”दिशा महाराष्ट्राची” या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त दुसरे कवी संमेलन आणि राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आनंद शिवराम जाधव यांना दिशा महाराष्ट्राची या संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर, कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.रोहिणी दिक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक, साहित्यिक आणि कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते “राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२५ ” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, जुईनगर स्टेशन जवळ नवी मुंबई येथे आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सन्मान सोहळा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.यावेळी विवीध स्तरातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन दिशा महाराष्ट्राची या संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर, सौ.सपना तुषार नेवरेकर यांनी केले होते

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात