पंचायत समिती गुहागर यांचे वतीने संविधान दिनानिमित्त मिशन तालुकास्तरीय लोकशाही परीक्षेचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पंचायत समिती गुहागर यांचे वतीने संविधान दिनानिमित्त मिशन तालुकास्तरीय लोकशाही परीक्षेचे आयोजन

गुहागर ~पंचायत समिती गुहागर आयोजित गटविकास अधिकारी माननीय भिलारे साहेब यांच्या संकल्पनेतून इयत्ता चौथी, पाचवी, सहावी ,सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता मिशन लोकशाही परीक्षेचे आयोजन करण्यात आले .विद्यार्थ्यांना संविधानाबाबत जागृती होऊन सखोल माहिती मिळावी तसेच स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत व्हावा या उद्देशाने गुहागर तालुक्यामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेण्यात आला , रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वैदेही रानडे मॅडम ,शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय लोहार साहेब यांनी सदर उपक्रमाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेच्या या युगामध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेच्या आयोजनाची आवश्यकता त्यांनी विशद केली. या स्पर्धा परीक्षेच्या आयोजनासाठी अत्यंत काटेकोर असे नियोजन करण्यात आले होते या चाळणी परीक्षेनंतर 5 डिसेंबर २०२५ रोजी तालुकास्तरावर 240 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा घेण्यात येणार असून त्यातून प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली व मुंबई येथे अभ्यास वर्गासाठी विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निवड होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी ,कर्मचारी, लोकप्रतिनिधी , सर्वतोपरी सहकार्य करणारी पंचायत समितीतील सर्व यंत्रणा, तसेच प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.त्याबद्दल गटविकास अधिकारी भिलारे साहेब यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले .त्याप्रसंगी गुहागरचे गटशिक्षणाधिकारी श्री गळवे साहेब पंचायत समिती गुहागरचे अधिकारी कारंडे साहेब ,केंद्रप्रमुख वसावे सर व गुहागर तालुक्यातून सर्व भागातून आलेले सर्व शिक्षक उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात