स्पर्धा स्वतःशीच करा,यश निश्चित – शेखर भिलारे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्पर्धा स्वतःशीच करा,यश निश्चित – शेखर भिलारे

आबलोली (संदेश कदम)

अभ्यासात मी पहिल्यापासून खूप हुशार होतो. 7 वी पर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. पुढे मी हायस्कूलला गेलो माझ्या वर्गात एक मुलगी आली होती. ती खूप हुशार होती. आठवीला मला 78% होते मी पहिलाच नंबर काढायचो मी खुश होतो आणि तिला 88% मार्क पडले होते. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांनी ती शाळेत दाखल झाली होती. ती खूप हुशार होती. नववीला मला 84% मार्क मिळाले.आणि तिला 82%होते. तरीही शिक्षकांनी माझ्याशी अबोला धरला होता.मी नाराज होतो. मला काही कळत नव्हते.

पण माझ्या शिक्षकांनी मला समजून सांगितले तू शाळेला विश्व समजतोस तुझी क्षमता मला माहिती आहे. तुझा पहिला नंबर आला म्हणजे तू काहीतरी जगावेगळे केले तसे तुला वाटत असेल तुला 84 % पडलेत ना? तिथे तुला 94% मार्क पडायला पाहिजे होते एवढा तू हुशार आहेस आणि हे तुझी कारके बघून मला खूप त्रास होतोय. तुझे जर कौतुक केले तर तू असाच राहशील.असे शिक्षक मला बोलल्याने खूप पश्चाताप झाला त्याच दिवशी मी ठरवले ही स्पर्धा दुसऱ्या विद्यार्थ्याची न करता स्पर्धा स्वतःशीच करावी आणि प्रयत्नशील राहिलो स्वतःशीच स्पर्धा केली दहावीला 94%मार्कांनी पास झालो. म्हणून सांगतो विद्यार्थ्यांनो स्पर्धा स्वतःशीच करा यश निश्चित मिळते. असे स्पष्ट मत गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी व्यक्त केले.

गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. 1 या शाळेत मिशन लोकशाही स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी कु.स्वराज दत्तात्रय राठोड हा विद्यार्थी केंद्रस्तरावर पहिला आला तालुकास्तरावर तो तिसरा आला तसेच कु.भूषण बाळासाहेब लवटे हा विद्यार्थी मिशन लोकशाही स्पर्धेत केंद्रस्तरावर तिसरा आणि तालुकास्तरावर नववा आला या विद्यार्थ्यांचे खास अभिनंदन करण्यासाठी आणि पाठीवर शाब्बासकीची थाप मारण्यासाठी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे हे जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. 1 येथे आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून पुढे म्हणाले की, यश मिळवले म्हणून हुरळून जाऊ नका. प्रत्येकाने हे ठरवा की 100 पैकी मला 82 मार्क मिळाले तर माझे 18 मार्क कुठे गेले हे या वयात जर त्या मुलाला कळालं ना? तर त्याला कळेल स्पर्धा जगाशी नाही स्पर्धा माझी माझ्याशीच आहे. आणि ज्यावेळी मी माझ्याशी स्पर्धा करतो ना? तेव्हा मी उत्कृष्ट माझं रूप बघतो. आणि माझ्या शिक्षकांचे हे वाक्य घेऊन मी एवढा अभ्यास केला की,

10 वीला खरंच त्यावेळी 94% मार्क मला पडले असे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, शिक्षण तज्ञ विलास गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र साळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गुरव यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी शिखर भिलारे, खोडदे सरपंच कु. पूजा गुरव, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी,शिक्षण तज्ञ विलास गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र साळवी, ग्रामपंचायत सदस्य सौ. तनुजा सुमित पवार, शाळा कमिटी सदस्य दीक्षा नेवरेकर, सौ.मानसी साळवी, बाळासाहेब लवटे, अपूर्वा जाधव, पालक -सौ. प्रीती सुर्वे, सौ.मेघा पवार, माजी विद्यार्थी सर्वेश साळवी, अंगणवाडी सेविका सौ. श्वेता गुरव, अशा सेविका सौ. मधुरा साळवी, पोलीस पाटील सौ.श्रद्धा गोणबरे, ग्रामस्थ वसंत पाडावे, मुख्याध्यापिका प्रीता गावंडे, शिक्षिका संध्या पाटील आदी. उपस्थित होते.नीटनेटके सूत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रिता गावंडे यांनी केले तर संतोष गुरव यांनी सर्वांचे आभार मानले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार