मुंबईत आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार ब्रुकफील्ड; 45 हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार ब्रुकफील्ड; 45 हजार रोजगार निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला GCC व AI हब बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल; मायक्रोसॉफ्ट, FedEx कडूनही गुंतवणुकीचे संकेत

बातमी:

मुंबई : महाराष्ट्राला Global Capability Center (GCC) हब बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेत ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ANSR चे सीईओ विक्रम आहुजा आणि ब्रुकफील्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यात होणाऱ्या गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित रोजगारनिर्मितीबाबत सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील कुशल मनुष्यबळ, मजबूत पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र हे GCC साठी जागतिक पातळीवर पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर कौशल्याधारित रोजगारनिर्मिती व आर्थिक वृद्धी साध्य होणार आहे.

दरम्यान, जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC व ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टकडे आगामी गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची विनंती केली असून, सध्या देखील मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रातच आहे. भविष्यात मायक्रोसॉफ्ट मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचवेळी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष सादरीकरण केले. AI च्या माध्यमातून गुन्हे नियंत्रणासाठी महाराष्ट्राने विकसित केलेले मॉडेल देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावर चर्चा झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपल्या $17 अब्जांच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तसेच, महाराष्ट्राने विकसित केलेल्या “Marvel” प्लॅटफॉर्ममुळे सायबर व आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांऐवजी केवळ 24 तासांत शोधणे शक्य झाले असून, नागरिकांचे आर्थिक नुकसान वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अनबलगन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात