डोंबिवली (भोपर) येथील भीमाई नगरमध्ये HT लाईनची तुटली वायर; म्हैशी चा मृत्यू

डोंबिवली प्रतिनिधी :- निलेश रहाटे
डोंबिवली शहरातील भोपर परिसरातील भीमाई नगर येथे महावितरणच्या HT लाईनची तुटलेली वायर जमिनीवर पडलेली असताना त्याचा स्पर्श लागून एका म्हैशी चा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १३ डिसेंबर २०२५ रात्री १०:३०च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणची HT लाईन तुटून जमिनीवर पडलेली होती. या तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात म्हैस आल्याने तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसून म्हैशी चा तात्काळ मृत्यू झाला.
महावितरण प्रशासनाने व पोलीसानी येऊन तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करून तुटलेली HT लाईन दुरुस्त केली तसेच म्हैशी च्या मालकाला नुकसान भरपाई देण्याची कबुली महावितरण अधिकारी नी केली.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
















