डाॅ. मनीषा कामत यांच्या “मनोमनी” काव्यसंग्रहाचे यशस्वी प्रकाशन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डाॅ. मनीषा कामत यांच्या “मनोमनी” काव्यसंग्रहाचे यशस्वी प्रकाशन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डहाणूकर कॉलेज, घैसास सभागृह, विलेपार्ले येथे डाॅ. मनीषा कामत यांच्या “मनोमनी” काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत राघवन यांच्या हस्ते यशस्वीपणे पार पडले. मनीषा कामत ह्या पूर्वाश्रमीच्या मनीषा कुळकर्णी, पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून डाॅ. झाल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत.

डॉ. मनीषा कामत यांनी काही एकांकिका लिहिल्या असून त्यात लहान भूमिका केल्या आहेत. त्यांचे पती सलील प्रतापराव कामत हे संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत स्थायिक असून, तबला व ढोलक वाजवण्यात तसेच गायनात कुशल आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मनीषा यांनी लिहिलेल्या नांदीने, संपदा मनीष नाडकर्णी यांनी आपल्या सुमधुर गायनाने केले. कवयित्री डाॅ. मनीषा आणि सलील कामत यांची मुलाखत मनिष अविनाश नाडकर्णी यांनी घेतली. तर डॉ. मनीषा यांची मुलगी कु. ऋचा हिने आईची कविता सादर केली.

सुप्रसिद्ध संगीत शिवस्वराज्यगाथा या कार्यक्रमाचे कवी, संगीतकार व गायक अनिल शशीकांत नलावडे यांचाही समारंभात सहभाग होता. पार्ले टिळक विद्यालयाच्या शिक्षकांचा हृद्य सत्कार कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. डाॅ. मनीषा आणि सलील कामत यांना आशीर्वाद देण्यासाठी गोरेबाई, देवबाई, नवाथेबाई, तांबोळीबाई, वेलणकरबाई, वावीकरबाई, बापटबाई, पेठेबाई आणि चुरीबाई उपस्थित होत्या.

प्रकाशन सोहळा डाॅ. मनीषा आणि सलील कामत आणि त्यांच्या कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर जुने मित्र आणि नातेवाईक गप्पा मारत अल्पोपहाराचा आस्वाद घेत राहिले आणि छायाचित्रांच्या स्वरूपात समारंभाच्या आठवणी कायमच्या जतन केल्या.

प्रकाशन समारंभादरम्यान डॉ. मनीषा यांच्या काव्यरुपांचे सादरीकरण, नांदी सादरीकरण, शायरी, कविता वाचन आणि शिक्षकांचा सत्कार हे सर्व मनःस्पर्शी अनुभव ठरले. हा प्रकाशन समारंभ उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात कायम राहील, अशी भावना व्यक्त करत सर्वांनी डाॅ. मनीषा कामत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या काव्यसंग्रहासाठी शुभेच्छा दिल्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात