पाच दिवस नव्याने रणधुमाळी रंगणार; ‘स्थानिक’ निवडणुकीत प्रचाराचा दुसरा अंक.!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔹पाच दिवस नव्याने रणधुमाळी रंगणार; ‘स्थानिक’ निवडणुकीत प्रचाराचा दुसरा अंक.!

 

न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगर पंचायतच्या अध्यक्ष, सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तर वाशीम जिल्ह्यातील वाशीम व रिसोड येथील काही प्रभागांचा समावेश आहे. आगामी पाच दिवसांत या ठिकाणी प्रचाराचा दुसरा अंक रंगेल. नव्याने सुरू होणाऱ्या रणधुमाळीत पुन्हा एकदा प्रचारतोफा धडाडण्याची चिन्हे आहेत.

 

राज्यात २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ०४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्याची तरतूद आहे. अपील दाखल करण्यात आलेल्या ठिकाणी निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत येणे आवश्यक होते. त्यामुळे उमेदवारास त्याचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता.

 

काही ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केल्याने ही कार्यवाही नियमबाह्य ठरल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. अपील दाखल असलेल्या ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाने स्थगिती दिली.

 

गुंड मयुर शिंदे याच्या पक्षप्रवेशासाठी उद्या भाजपचे शक्ती प्रदर्शन

अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेची निवडणूक स्थगित झाली. बाळापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासंदर्भात न्यायालयात अपील दाखल होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळापूरची नगराध्यक्षांसह सर्व सदस्य पदासाठीची निवडणूक स्थगित झाली. वाशीम जिल्ह्यातील वाशीम येथे नगराध्यक्ष पदासंदर्भात दाखल याचिकेवर २५ नोव्हेंबरला निकाल आल्याने त्याठिकाणीची देखील संपूर्ण निवडणूक स्थगित झाली. रिसोड नगरपालिकेतील प्रभाग ५ ब आणि प्रभाग १० अ मध्ये सदस्य पदाची निवडणूक स्थगित होती. सुधारित कार्यक्रमानुसार या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

 

बाळापूर आणि वाशीम येथे कुठल्याही उमेदवाराने माघार घेतली नसून रिसोड येथे एक अर्ज मागे घेतला आहे. निवडणूक लांबणीवर पडल्याने उमेदवारांना प्रचारासाठी बराच कालावधी मिळाला. मात्र, खर्चाची मर्यादा असल्याने प्रचार थंडावला होता. उमेदवारांकडून भेटीगाठीवर भर देण्यात येत आहे. शिवाय हिवाळी अधिवेशनात नेते व्यस्त होते. आता पुन्हा नव्याने प्रचार सुरू होऊन शेवटच्या पाच दिवसांमध्ये प्रचार मैदान गाजण्याची शक्यता आहे.

 

राज्यात २४ ठिकाणी सर्वच, तर १५४ सदस्यपदांची निवडणूक

 

राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच ठिकाणी २१ डिसेंबर मतमोजणी होईल.

१९ ला रात्री १० पर्यंत प्रचार

निवडणूक आयोगाच्या प्राप्त निर्देशानुसार मतदानांच्या अगोदरच्या रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त डॉ. विश्वनाथ वडजे यांनी दिली.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा