गणपतीपूळे येथे सुमो च्या धडकेने दुचाकी स्वार तरुण ठार…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी : (वार्ताहर) Ratnagiri रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणा-या तरूणाच्या दुचाकीला बसणी-नागझरी येथील वळणावर टाटा सुमोची जोरदार धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पाठलाग करून पकडले. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरूणी किरकोळ जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाली येथील राहणारा सौरभ मधूकर काजरेकर (वय २५, रा. डोंगरेवाडी-पाली, रत्नागिरी) हा गणपतीपुळेकडून दुचाकी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येत होता. त्याच्या दुचाकीच्यामागे त्याची मैत्रिण वृषाली जगदीश धाडवे (वय २१, रा. उमरे-चांदेराई) ही बसली होती. भरधाव वेगात असलेल्या टाटा सुमोची सौरभच्या दुचाकीला धडक बसली. Sumo car bike accident

दोघेही रस्त्यात कोसळले देवगडवरून काही तरूण टाटा सुमो घेऊन गणपतीपुळेला निघाले होते. बसणी-नागझरी येथील वळणावर भरधाव सुमोने रत्नागिरीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सौरभच्या डोक्यात हेल्मेट होते. मात्र ही धडक इतकी मोठी होती की, सौरभच्या डोक्यातील हेल्मेट २५ फूट लांब चेंडूसारखे उडाले व त्याची दुचाकी रस्त्यावरून फरफटत रस्त्याच्या कडेला उडाली. या अपघाताचा आवाज झाल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या तरूणीने आरडाओरड करायला सुरूवात केली. हा आवाज ऐकून तेथील स्थानिक ग्रामस्थांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली. बसणी- नागझरी येथे झालेल्या अपघातानंतर सौरभ व वृषाली हे दोघेही रस्त्यात कोसळले.

सौरभ याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रस्त्यात पडला होता. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून या अपघातानंतर सुमो चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. गणपतीपुळे येथून सुमो सुसाट वेगाने निघाली असताना स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून देवगड येथील सुमो अडवली. या गाडीमध्ये ५ ते ६ तरूण होते. ते गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुमो चालक केतन नवलकोंदे (वय २०, रा. देवगड) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के