तळवली हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात पार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात पार

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर जि.रत्नागिरी या प्रशालेत गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका अध्यक्ष मा.मंगेश गोरिवले सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने केले.तसेच मुख्याध्यापक श्री.एम. ए.थरकार सर,श्री.घाग सर,श्री.मोहिते सर,श्री.शिर्के सर, सौ. वाघे मॅडम,यांच्याही हस्ते दीपप्रज्वलन केले.त्यानंतर पुज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

*या स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी बारावी अशा तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे मुख्याध्यापक श्री.एम. ए.थरकार सर व इतर सहाय्यक शिक्षक यांनी केले होते.गुहागर तालुक्यातील स्पर्धकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

कथाकथन स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक गुहागर हायस्कूलची विद्यार्थिनी कु.दुर्वा दशरथ नाटेकर, द्वितीय क्रमांक बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेलचा विद्यार्थी कु. श्रीपर्ण मंगेश गोरीवले तर तृतीय क्रमांक इंग्लिश मेडियम स्कूल पाटपन्हाळेची विद्यार्थिनी कु.लावण्या अंकुश चव्हाण . हिने पटकावला. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक कोळवली हायस्कूलची कु.सई समीर रानडे, द्वितीय क्रमांक पाचेरी आगर वझे हायस्कूलची विद्यार्थिनी कु.गौरी दीपक झोरे तर तृतीय क्रमांक तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी कु.तनुश्री नोमेश कारेकर हिने पटकावला.अकरावी- बारावी गटात प्रथम क्रमांक पाटपन्हाळे हायस्कूलची विद्यार्थिनी कु. सदिच्छा संदीप कदम द्वितीय क्रमांक तळवली हायस्कूलची विद्यार्थिनी कु.श्रावणी संदीप कळंबाटे तर तृतीय क्रमांक अंजनवेल हायस्कूलची कु.ज्ञानेश्वरी कीरण शेळके हिने पटकावला.

तीनही गटात प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या सचिव श्री. साठे सर यांनी तीनही गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

*या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्री. देवरुखकर सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री.साळुंके सर यांनी केले.श्री.कुळे सर यांनी सुंदर फलकलेखन केले होते.ते या स्पर्धेचे आकर्षण होते.श्री.केळस्कर सर यांनी सर्व स्पर्धक, मार्गदर्शक शिक्षक व सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा