खालगाव प्रीमियम लीग ( KPL ) तर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ संपन्न..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खालगाव प्रीमियम लीग ( KPL ) तर्फे विद्यार्थी गुणगौरव आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ संपन्न..

रत्नागिरी. (राजपवार वार्ताहर)

रत्नागिरी जिल्ह्यातील खालगाव प्रीमियर लीग ( KPL ) तर्फे खालगाव गावातील १० वी, १२ वी, पदवीधर, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांचा गुणगौरव सोहळा आणि सत्कार समारंभ ग्रामदेवता मंदिर खालगाव याठिकाणी अत्यंत जल्लोषात संपन्न झाला. यावेळी

गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश खोल्ये, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस विजय धामणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.यावेळी धाऊल वाडी येथील मुलींनी स्वागत गीत सादर केले आणि रामगडे वाडीतील मुलींनी मधुर स्वरात प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात मंत्रमुग्ध वातावरण करून केली. सुरुवातीला १० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना फाईल, पुष्पगुच्छ, श्रीफळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर पदवीधर मधील दिप्ती शिंदे ( MBBS ), अक्षय धामणे ( CA ), साहिल धामणे ( BE ), साक्षी शिंदे ( BMS ), प्राजक्ता खोल्ये ( Agriculture ), लहू घाणेकर ( MSF ), रोशन गोताड ( Artist ), सिद्धी धामणे, अंकुश घाणेकर,साहिल प्र.धामणे, प्रतिम धामणे, तन्वी धामणे, रोहित धामणे, संकेत धामणे,राज धामणे, यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर जेष्ठ नागरिक यांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी

प्रकाश शेंडे, दत्ताराम रामगडे, अनंत शेंडे, दामोदर रामगडे, ग्रामदेवता मंदिर अध्यक्ष अनंत रहाटे,सचिव श्रीकांत निवळकर, खजिनदार गणपत गोताड, विश्वेश्वर काळभैरव मंडळाचे सचिव विलास धामणे, ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा रामगडे, दिपक शिंदे, विष्णू गोताड, यशवंत गोंधळी, दिनेश साहेब,तसेच पत्रकार राज पवार , आणि अनेक मान्यवर या गुणगौरव कार्यक्रमास उपस्थित होते.

विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि जेष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन नंदकिशोर धामणे, चंद्रकांत धामणे, अमर्थ जाधव यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक खालगाव प्रीमियर लीग ( KPL ) यांचे अध्यक्ष मच्छिंद्र रामगडे, सेक्रेटरी सुदीप जाधव, खजिनदार संदिप धामणे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि तरुणवर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात