स्त्री मुक्ती परिषदेचा ‘ठराव जाहीरनामा’ प्रसारित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

स्त्री मुक्ती परिषदेचा ‘ठराव जाहीरनामा’ प्रसारित

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्त्री मुक्ती परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचा समारोप आज मोठ्या उत्साहात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. या समारोपप्रसंगी स्त्री मुक्ती परिषदेचा सविस्तर ‘ठराव जाहीरनामा’ जाहीर करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, डॉ. छाया दातार, डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या ठरावात महिला आयोगाची निष्क्रियता, जेन्डर बजेटची प्रभावी अंमलबजावणी, मनरेगामधील बदललेल्या कायद्याला विरोध आणि मनरेगाचा हक्क सोडणार नाही, हा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. मुस्लिम महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, देशातील वाढता सांप्रदायिक हिंसाचार आणि सांप्रदायिक राजकीय वातावरणाचा मुकाबला करण्याची जबाबदारी, तसेच “मनुस्मृती नको, संविधान हवे” ही स्पष्ट भूमिका ठरावातून मांडण्यात आली.

 

यासोबतच कौटुंबिक हिंसाचार, जातआधारित हिंसा व छळवणूक, क्वीअरट्रान्स लोकांचे प्रश्न, अपंग महिलांचे प्रश्न, महिलांना त्यांच्या गरजांनुसार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, लैंगिक सेवा पुरविणाऱ्या लैंगिक श्रमिकांचे हक्क, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नैसर्गिक संसाधनांवरील महिलांचा अधिकार, कचरावेचकांचे प्रश्न व कचरा व्यवस्थापन, तसेच प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांची भूमिका या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडण्यात आली. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमातून स्त्री चळवळीचा इतिहास व विचारांचा समावेश करावा, तसेच सांस्कृतिक जीवनात स्त्रियांच्या योगदानाची ओळख अधिक ठळकपणे निर्माण करावी, यावरही ठरावात भर देण्यात आला.

 

परिषदेच्या समारोपानिमित्त मुंबईतील आझाद मैदानात भव्य सांस्कृतिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला प्रतिनिधींनी कविता सादर केल्या, गाणी म्हटली आणि आपल्या अनुभवांना शब्द दिले. आदिवासी, मुस्लिम, कष्टकरी महिलांसह विविध समुदायांतील महिलांना मंचावर येऊन आपल्या विभागातील समस्या मांडण्याची संधी देण्यात आली.

 

या वेळी एका महिलेने महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. आजही अनेक गावांमध्ये चावडीवर स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. या पार्श्वभूमीवर गावातील महिला आणि LGBTQ+ समुदायातील प्रतिनिधींना एकत्र घेऊन ‘चावडी सावित्री फातिमाची’ हा उपक्रम राबवावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या उपक्रमांतर्गत चावडीवर किर्तन, भारूड, व्याख्यान किंवा चर्चा आयोजित करून सामाजिक बदलाचा संदेश देण्याची संकल्पना मांडण्यात आली असून, या उपक्रमाची सुरुवात येत्या ३ जानेवारीपासून करण्याचे आवाहन करण्यात आले. ही सुरुवात सावित्रीबाई फुले यांना दिलेली मानवंदना ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

 

‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकाच्या प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, समता प्रस्थापित करायची असेल तर ममता आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करणे हेच स्त्री चळवळीचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

स्त्री मुक्ती चळवळीचे प्रतिनिधी सुरज पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या ५० वर्षांत स्त्री मुक्ती चळवळीने महत्त्वाचे कार्य केले आहे आणि पुढेही हे कार्य सुरू राहील. मात्र, खरी गरज पुरुषांना समानतेची भाषा समजावून सांगण्याची आहे. ही भाषा घराघरातून पोहोचली पाहिजे. स्त्री मुक्ती चळवळ ही पुरुषविरोधी नसून पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात आहे. पुरुष म्हणजे मर्दागी हा संकुचित विचार खोडून काढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या ठराव जाहीरनाम्यातून स्त्री मुक्ती परिषदेने महिलांचे, कष्टकरी वर्गाचे आणि वंचित समुदायांचे प्रश्न ठामपणे मांडत आगामी काळातील संघर्षाची दिशा स्पष्ट केली असून, सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार