पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमीत महाराणी येसुबाईंचा स्मृतिदिन संपन्न ;

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमीत महाराणी येसुबाईंचा स्मृतिदिन संपन्न ;

पुणे (प्रतिनिधी) : महाराणी येसुबाईंचा (राजमाता राजाऊ साहेबांचा ) २९५ वा. ” स्मृतिदिन ” रविवार दि.२१ डिसेंबर रोजी पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक, येसुबाईंचे वंशज, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे शिर्के उपस्थित होते.*

*महाराणी येसुबाईंच्या माहेर कडील श्रीमंत राजे शिर्के घराण्यातील वंशजांनी येसुबाईंचा जयंती सोहळा व स्मृतिदिनाचे आयोजन करून राजमाता राजाऊंचे (येसुबाईंचे) स्मरण करण्याबाबत नुकतेच प्रबोधनात्मक आवाहन केले होते. त्यानुसार पत्रकार व इतिहास अभ्यासक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांच्या आवाहनाला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला असून, समस्त शिर्के परिवारांनी, गडदुर्ग संवर्धकांनी , लेखक, इतिहास प्रेमींसह शिव-शंभुभक्तांनी राज्यभरात ठिकठिकाणी स्मृतिदिनाचे आयोजन करून महाराणी येसुबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्वराज्य कार्याची माहिती देऊन येसुबाईंच्या चरणी विनम्र अभिवादन केले.*

*त्याप्रमाणे पुणे लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमीत ही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी येसुबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, वंशज श्रीमंत दिपकराजे शिर्के यांनी बोलताना येसुबाईंच्या जीवनातील कर्तव्य, शौर्य, त्याग, संस्कार आदी विषयांवर आधारित थोडक्यात राजमाता राजाऊंच्या जीवनावर व्याख्यान दिले. आता इथून पुढे सर्वांनी राजमाता येसुबाईंना २७ जुलै रोजी जयंती दिवशी व २१ डिसेंबर रोजी स्मृतिदिनाला स्मरण केले पाहिजे. शिव-शंभुभक्तांनी घराघरात येसुबाईंची प्रतिमा लावली पाहिजे तसेच त्यांचे आदर्श विचार तरूणांनी आंगीकारले पाहिजेत असे प्रबोधनात्मक आवाहन ही राजेशिर्के यांनी केले. यावेळी प्रशिक्षण संस्थेचा शिक्षक स्टाफ, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

*जय जिजाऊ , जय राजाऊ..!*

*जय शिवराय , जय शंभुराजे..!*

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात