माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

*माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

रत्नागिरी :- निलेश रहाटे

२६ डिसेंबर

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे प्रशालेकडून वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये दि.२३ डिसेंबर रोजी फनिगेम्सचे आयोजन करण्यात आले. त्याचे सर्व नियोजन श्री.रामदास पालशेतकर यांनी सर्व शिक्षकांच्या सहाय्याने केले.प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी यादिवशी अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले.

त्याचप्रमाणे दि. २४ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी प्रदर्शन व चित्रकला आणि हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.गोकुळ विजय देसाई व देसाई मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गणितीय प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.अशोक बळवंत विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर डॉ.गोकुळ विजय देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

*माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटद खंडाळा व श्रीमती पा.शं.बापट कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

याप्रसंगी राज्यस्तरावर क्रिकेट आणि डॉजबॉल संघात निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच कुमारी मनाली निंबरे हिचे क्रिकेट खेळातील यश पाहून शाळेचे माजी विद्यार्थी प्रणव पुष्पराज पाटील यांनी तिला सुमारे ६००० किमतीचे क्रिकेट किट भेट म्हणून दिली.शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दलची माहिती सर्वांसमोर मांडली.संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक श्री.अनिकेत सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये सुरुवातीला ईशस्तवन व स्वागतगीत सादर झाले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोळीनृत्य, कथ्थक नृत्य,प्रबोधनपर नाटिका,गीत गायन,भारुड असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला तबला,ढोलकी आणि हार्मोनियमची साथ शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.सतीश मोहित,कुमार सुयश पडवळे आणि सहाय्यक शिक्षक श्री.प्रभाकर धोपट यांनी दिली.

यावेळी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, उपाध्यक्ष श्री. रामनाथ आडाव, सचिव श्री.समीर बोरकर,कोषाध्यक्ष श्री. दिवाकर जोशी, सहकार्यवाह श्री. संदीप सुर्वे,संचालक श्री.अनिकेत सुर्वे,श्री.कमलेश बापट,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.सुजित दुर्गवळी, शिक्षक पालक संघाचे सहसचिव श्री.चंद्रकांत विचारे,संस्थेचे माजी संचालक, संस्थाचालक,माजी मुख्याध्यापक,पंचक्रोशीतील बहुसंख्य पालकवर्ग, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.प्रभाकर धोपट आणि सुनील कांबळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री.प्रभाकर धोपट यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.

हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास संस्थेचे संस्थाचालक,शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी जगताप,पर्यवेक्षक श्री.आनंद पाटील,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, दहावीतील स्वयंसेवक,बहुसंख्य विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात