“माझ्याच सोबत असं का घडतं ?” असं कधी तुम्हाला वाटलंय का ? जर कधी तुम्हाला वाटलं ?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

“माझ्याच सोबत असं का घडतं ?” असं कधी तुम्हाला वाटलंय का ? जर कधी तुम्हाला वाटलं ?

“माझ्याच सोबत असं का घडतं ?” असं कधी तुम्हाला वाटलंय का ? जर कधी तुम्हाला वाटलं असेल की मी जगातला सगळ्यात दुर्दैवी माणूस आहे, तर जरा ‘फ्रॅन सेलाक’ यांच्याबद्दल जणून घ्या. हे महाशय जगातील सर्वात दुर्दैवी माणूस म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या आयुष्याकडे बघितल्यावर समजेल, हे तर सर्वात सुदैवी आहेत. काय आहे त्यांची गोष्ट ?

****

‘फ्रॅन सेलाक’ हे गृहस्थ १९६२ पर्यंत अत्यंत सुखी होते. त्यांनंतर त्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. झालं असं की, ते ट्रेनने प्रवास करत होते आणि ट्रेन नदीत कोसळली. ट्रेन मधले १७ प्रवासी ठार झाले. पण एकटे फ्रॅन मात्र वाचले. हे महाशय पोहत तीरावर पोहोचले. अपघातात त्यांचा हात मात्र दुखावला गेला. जिवंत वाचले तेच काय कमी आहे. ही तर सुरुवात होती,ष्टोरीला आता कुठे सुरुवात झाली होती.

पुढच्याच वर्षी १९६३ साली ते एका विमानातून जात होते. त्या विमानाचा अपघात झाला आणि १९ जण मारले गेले. फक्त फ्रॅन एकटेच एका गवताच्या गंजीवर जिवंत आढळले. त्यांचे डोळे उघडले तेव्हा ते हॉस्पीटल मध्ये होते.

१९६६ रोजी ते एका बस मधून प्रवास करत होते आणि अर्थातच बसचा अपघात झाला. ४ जण ठार झाले. इथे सुद्धा बस एका नदीत कोसळली. यावेळी पण ते पोहून नदीतून बाहेर आले आणि वाचले.

पुढील जवळजवळ ४ वर्ष निवांत, सुखात गेली. कोणताही अपघात झाला नाही, त्यांचा साधा पायाचा अंगठाही कुठे धडकला नाही. पण हा तर इंटरव्हल होता !

****

१९७० साली दिवस स्वच्छ होता, ते आपल्या कार मधून जात होते. आणि अचानक कारच्या इंधनाच्या टाकीत स्फोट झाला. कारला आग लागली. इथे सुद्धा ते कसेबसे बाहेर पडले. पुन्हा १९७३ साली अशाच एका कार अपघातातून ते वाचले. एका खराब इंधन पंपांमुळे त्यांच्या कारला आग लागली. या आगीत त्यांना काही झालं नाही पण केसांचा बळी गेला. त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस जळाले.

पुढे पुन्हा एक मोठा इंटरव्हल आला. २२ वर्ष काहीच घडलं नाही. मग १९९५ साली त्यांना एका बसने धडक दिली. पण त्यांना अगदी थोडा मार लागला. पुढच्याच वर्षी १९९६ रोजी ते एका डोंगरी भागावर आपली कार घेऊन गेले होते की त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. धडक देण्यापूर्वीच ते कार मधून बाहेर पडले होते. दुसऱ्याच क्षणी मोठा स्फोट होऊन त्यांची कार जळून खाक झाली. एका सेकंदाचा फरक आणि ते जिवंत वाचले.

****

७ वेळा दुर्दैवाशी सामना झाल्यानंतर २००३ साली अचानक त्यांचं नशीब फळफळलं. त्यांना तब्बल ८,००,००० लाख युरोची लॉटरी लागली.त्यांनी लॉटरीच्या पैशातून एक घर आणि बोट विकत घेतली. या दरम्यान त्यांनी पाचवं लग्न केलं होतं. २०१० साली त्यांनी आपले पैसे नातेवाईक, मित्र आणि गरजूंना देऊन टाकले. पुढे त्यांना एकाही दुर्दैवाने गाठलं नाही. हॅपी एंडिंग !!!

****

७ वेळा मृत्युच्या तोंडाशी जाऊन हा माणूस सुखरूप परतला. आता तुम्हीच सांगा, हा माणूस सतत कोणत्याना कोणत्या अपघातात सापडला म्हणून दुर्दैवी म्हणायचा की त्याच अपघातातून जिवंत वाचला म्हणून सुदैवी ??

साभार ~सोशल मीडिया व्हायरल.🙏

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा