शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय,खरवते – दहिवली यांना शासन मान्यता प्राप्त आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजुर..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय,खरवते – दहिवली यांना शासन मान्यता प्राप्त आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजुर…… छाया – संदेश कदम

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय,खरवते – दहिवली यांना शासन मान्यता प्राप्त आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र मंजुर..!

दि.२० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार ऑनलाईन उदघाटन..!

आबलोली (संदेश कदम)……
कृषि पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे व कृषि पुरक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कौशल्य युक्त कृषि उद्योजक तयार करण्याच्या उद्देशातून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या धर्तीवर चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभाग यांच्या मान्यतेने सुरु करण्यात येणार आहे.या कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,श्री.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार व श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयामध्ये दोन प्रमुख विषयांवर कृषि शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यामध्ये कृषी प्रक्षेत्र अधिकारी व रोपवाटिका व्यवस्थापक ई.विषयांचा समावेश आहे.या कौशल्य विकास केंद्रामधुन जास्तीत जास्त कृषी पदवीधरांना प्रशिक्षण देवुन आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम बनविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली असुन त्यांना नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीया व सेक्टर स्कील काॅउनसिल ,न्यु दिल्ली या नामांकित शासकीय संस्थांकडुन मानांकित करण्यात आले आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

Leave a Comment

आणखी वाचा...