शिवस्वराज्य शेतकरी संघ, गुहागर–कुडली यांच्या मागणीला यश
आमरण उपोषणाबाबत प्रसिद्ध झालेल्या ‘रत्नागिरी वार्ताहर’च्या बातमीची महावितरणकडून दखल
गुहागर : सुजित सुर्वे ~प्रतिनिधी
शिवस्वराज्य शेतकरी संघ, तालुका गुहागर–कुडली यांच्या वतीने आम रण उपोषणाबाबत मांडण्यात आलेल्या मागण्यांवर तसेच यासंदर्भात रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची महावितरण प्रशासनाने अधिकृत दखल घेतली आहे. याबाबत उपकार्यकारी अभियंता, महावितरण गुहागर विभाग यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार, गुहागर तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सुरू आहे. नागरिकांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच महावितरणकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे काही अधिकारी सोमवारी व गुरुवारी कार्यालयात उपस्थित राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुडली, जांगळ वाडी आदी भागांतील विद्युत पोल बदलण्याबाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली असून १५ जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तांबड बाबर, मालटवाडी, वरची वाडी, काजर्ली, नवानगर, जांभारी, आवरे, पडवे आदी गावांमधील जुने डीपी व विद्युत पोल बदलण्याचे काम RDSS L.R. योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने कळवले आहे.
या पत्रामुळे स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने लेखी उत्तर दिल्याने नागरिक व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
✍️ रत्नागिरी वार्ताहर चे आभार .
ही बातमी रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आम्ही सदैव बांधील आहोत.
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल रत्नागिरी वार्ताहर व त्यांच्या संपूर्ण टीमचे शिवस्वराज्य शेतकरी संघाकडून मनःपूर्वक आभार 🌹🙏
असेच निर्भीड व प्रामाणिक सहकार्य गुहागर तालुक्यातील जनतेसाठी भविष्यातही लाभावे, ही अपेक्षा.
शिवस्वराज्य शेतकरी संघटना
आनंद भोजने, मंदार रहाटे, समीर सुर्वे,
उमेश सुर्वे, धनीत सुर्वे, आप्पा बेर्डे,
सुजय पवार, मनोज जाधव, नुरुल्ला जाभारकार,
प्रकाश कातळकर, गोपाळ हुमणे व सर्व सहकारी
—















