शिवसेना ,मनसे मध्ये आनंदाचे वातावरण – जि. प. पं. स. निवडणुका जिंकणारच – आम. भास्कर जाधव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना ,मनसे मध्ये आनंदाचे वातावरण – जि. प. पं. स. निवडणुका जिंकणारच – आम. भास्कर जाधव

आबलोली (संदेश कदम)
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघांमध्ये मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत.याच पार्श्वभूमीवर गुहागर विधानसभेचे आमदार भास्कर जाधव आज वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या बैठकीसाठी jकोतळूक येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते एक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचे वातावरण आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वच जाती-धर्माच्या लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने गुहागर मध्ये देखील प्रमोद गांधी आणि मी देखील एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शिवसेना मनसे मध्ये आनंदाचे वातावरण असून येत्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका आम्ही जिंकणारच असा विश्वास पत्रकारांशी बोलताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
वेळणेश्वर गटाची बैठक जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी कोतळूक येथे आयोजित केलेली होती. या बैठकीला वेळणेश्वर गटातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आम.भास्कर जाधव पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषद वेळणेश्वर गटातून सिद्धी रामगडे या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. तिचे वडील संतोष रामगडे हे सुरुवाती पासून काबाडकष्ट करून हॉटेल व्यवसाय करतात. त्यांच्याकडे मोठी फौज आहे. त्याचबरोबर सिद्धी रामगडे यांना सोशल वर्किंग करण्याची प्रचंड आवड आहे. त्या उमेदवार म्हणून आम्ही निवडलेल्या आहेत. वेळणेश्वर पंचायत समिती गणासाठी उमेदवार म्हणून सचिन जाधव हे उमेदवार आम्ही निवडलेले आहेत त्यांनी आतापर्यंत पक्षाचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे ते स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते परंतु दिवस रात्र पक्षाकरता धडपडणारा सकाळ, संध्याकाळ प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा कुठलीही गरज भासली तर त्या ठिकाणी धावून जाणारा असा सक्षम कार्यकर्ता आम्हाला उमेदवार म्हणून हवा आहे अशी मागणी त्यांच्या गणातील कार्यकर्त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तीसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या ओपन जागेवर पिंपरचे उपविभाग प्रमुख निखिल मोरे यांच्या सौभाग्यवती यांना आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे. अशी माहिती आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात