📍 “मराठी माणसाच्या विरोधात…”; मुंबई महापालिका निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून, महायुतीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकरे बंधू एकत्र येऊनही बहुमताचा आकडा गाठू न शकल्याने सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.
या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सहा नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आले असून, निकालानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे.
“आता मराठी माणसांना वाचवण्यासाठीची आपली लढाई सुरू झाली आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळात मनसेची भूमिका अधिक आक्रमक असण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलत असताना, राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे















