वेलदूर नवनगर मराठी शाळेची काशविंडा येथे क्षेत्रभेट संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवनगर मराठी शाळेची काशविंडा येथे क्षेत्रभेट संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतले शैक्षणिक अनुभवाचे प्रत्यक्ष धडे

गुहागर – वार्ताहर

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेची क्षेत्रभेट गुहागर एसटी आगार, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री व्याडेश्वर मंदिर, तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी देवीचे मंदिर, काशविंडा बीच, श्री वेळणेश्वर मंदिर, लक्ष्मी गणेश मंदिर आदी ठिकाणी, आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमा सोबतच प्राचीन कला परंपरा यांचे दर्शन घडविण्यात आले .विविध मंदिरातील स्थापत्यशैली ,ग्रामीण कलाकार लघु उद्योजक ग्रामीण जीवन ,गुहागर तालुक्याला लाभलेला प्राचीन वारसा याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.गुहागर एसटी आगार ला भेट देऊन आगार व्यवस्थापक श्री अशोक चव्हाण साहेब यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.सर्वसामान्य यांच्या आयुष्यात एसटीचे स्थान किती महत्त्वाचे आहे याची सविस्तर माहिती चव्हाण साहेब यांनी दिली .ग्रामीण भागाचे जीवनमान एसटीवर अवलंबून आहे .गुहागर आगाराचे डेपो मॅनेजर श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना हिरकणी कक्ष, वाहतूक कक्ष ,यांत्रिक विभाग ,आरक्षण कक्ष ,डिझेल विभाग ,आर्थिक व्यवहार, गुहागर आगारामध्ये समाविष्ट सेवेत असलेल्या एसटी बसेस, सर्विसिंग विभाग यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या त्या विभागात जाऊन माहिती दिली. विद्यार्थ्यांनी काही गाड्यांचे अनाउन्सिंग केले .त्यावेळी त्यांचे समवेत सहाय्यक एसटी अधिकारी श्री पवार साहेब श्री मंदार साहेब यांत्रिक विभाग हे होते .विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले .निसर्गाच्या कुशीत तवसाळ मध्ये असलेले व हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री महामाई सोनसाखळी देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घेऊन तहानभूक विसरून जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्ग संपन्न परिसराचा मनमुराद आनंद घेतला.काशविंडा बीच मध्ये प्रेक्षणीय सागरी किनाऱ्यावर विविध खेळ मनसोक्त खेळले.विद्यार्थी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन कृतिशीलतेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याने व नाविन्यपूर्ण अनुभवाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, उपक्रमाचे समन्वयक अफसाना मुल्ला, पदवीधर शिक्षक निलेश पाटील ,धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड यांनी प्रयत्न केले .तसेच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिल्पा कोळथरकर ,उपाध्यक्ष श्री रवींद्र जांभारकर ,श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधाकर कांबळे पत्रकार श्री संतोष घुमे यांचे सहकार्य लाभले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला