वहाळ जिल्हा परिषद गटातून सौ. शिवानी संदीप सावंत यांना महायुतीची उमेदवारी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🚩 वहाळ जिल्हा परिषद गटातून सौ. शिवानी संदीप सावंत यांना महायुतीची उमेदवारी 🚩

पालकमंत्री उदय सामंत यांची अधिकृत घोषणा; महायुतीच्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

चिपळूण :
वहाळ जिल्हा परिषद गटातून सौ. शिवानी संदीप सावंत यांना शिवसेना–महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी ही उमेदवारी जाहीर केली.

यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम, उपनेते माजी आमदार सदानंदजी चव्हाण, उपनेते माजी आमदार संजयराव कदम, माजी आमदार सुभाषजी बने, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव यांच्यासह शिवसेना व महायुतीच्या सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी सौ. शिवानी सावंत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा व संवेदनशील गट मानला जातो. या गटातून निवडणूक लढवणे म्हणजे मोठे आव्हान समजले जाते. मात्र, चिपळूण तालुक्यातील लढवय्या नेतृत्व म्हणून ओळख असलेले संदीप सावंत यांनी हे आव्हान स्वीकारत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केली होती.

या गटात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या त्यांच्या पत्नी सौ. शिवानी सावंत यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. उमेदवारी जाहीर होताच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

संदीप सावंत यांनी चिपळूण तालुक्यात विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपली ठळक ओळख निर्माण केली असून आंदोलन सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या न्यायहक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे.

सौ. शिवानी सावंत या देखील पतीच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. कोरोना काळातील त्यांचे कार्य, महिलांसाठी उभारलेले संघटन, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच शांत, संयमी व हसतमुख स्वभावामुळे त्या परिसरात लोकप्रिय महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.

या सर्व कार्याची दखल घेत महायुतीकडून त्यांना वहाळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम, भाजप नेते माजी आमदार डॉ. विनयजी नातू, भाजप नेते प्रशांतजी यादव, जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण, राहुलजी पंडित, जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला.

यामुळे वहाळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार