भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश रांगळे यांच्या पत्नी मानसी मंगेश रांगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश रांगळे यांच्या पत्नी मानसी मंगेश रांगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्राचार यंत्रणा जोरदार चालू आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातील मळण पंचायत समिती गणातून मानसी मंगेश रांगळे यांना उमेदवारी मिळाली असल्याने त्यांनी मळण पंचायत समिती गणात प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे . वैयक्तिक भेटीसह वाडी- वाडी, वस्ती – वस्तीवर जोरदार प्रचार यंत्रणा राबवीत आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मंगेश रांगळे यांनी राजकीय कामाबरोबरच लोकोउपयोगी सामाजिक कामांना प्राधान्य दिल्यानेच मानसी रांगळे यांना सामाजिक स्तरावरूनही वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यात अधिक भर म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत समाजाचे राजकारण जोरदार सुरू असल्याने त्याचाही फायदा मानसी रांगळे यांना होणार आहे. असे चित्र स्पष्ट झाले आहे.















