विकासकामांच्या झंजावातामुळे आमचा विजय निश्चित – तालुका प्रमुख सचिन बाईत
आमच्या उमेदवारांचा विजय हा मतदारांनी घेतलेला निर्णय – तालुका सचिव विलास गुरव
आबलोली (संदेश कदम)
तसं पाहिलं तर आव्हाने फार काही नाही आहेत. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन सर्वांपर्यंत पोहोचलो आहोत. आणि कोट्यावधी रुपयांची कामे जिल्हा परिषद गटामध्ये आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या स्थानिक विकास निधी मधून चालू आहेत. कितीतरी कामे पूर्णत्वास जात आहेत. एका बाजूला आम्ही भूमिपूजन केलेल्या कामांचा झंजावात सुरू असताना विरोधकांनी फक्त नारळ फोडून ठेवले आहेत. विरोधकांचे एकही काम चालू झालेले दिसत नाही. माझ्याबरोबर पडवे पंचायत समिती गणाचे उमेदवार रवींद्र आंबेकर आहेत पडवे पंचायत समिती गणनातून ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवत आहेत. कुठच्याही अमिषाला बळी न पडता, कुठच्याही प्रलोभनाला बळी न पडता. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच ते राहिलेले आहेत. ते पक्षाशी एकनिष्ठ असल्याने यांचा विजय निश्चित आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषद पडवे गटाचे उमेदवार सचिन बाईत यांनी बोलताना दिली. सचिन बाईत पुढे म्हणाले की, बाळासाहेबांचा पक्ष सोडून जाणाऱ्यांना शाप आहे. आणि त्याच्यामुळेच रवींद्र आंबेकर यांचा विजय माझ्याबरोबरच निश्चित आहे. पडवे पंचायत समिती गणात सर्व उमेदवारांना मते पडतील त्यांची बेरीज जेवढी होईल तेवढी बेरीज रवींद्र आंबेकर यांच्या मतांची होईल. अशी माहिती सचिन बाईत यांनी दिली.
यावेळी बोलताना तालुका सचिव विलास गुरव हे म्हणाले की, महाराष्ट्राचे, देशाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आम्ही सर्वजण जयंती साजरी करून त्यांना वंदन करूनच त्यांचे आशीर्वाद घेऊन या निवडणूक संपर्क कार्यालयात उमेदवारांसहित उपस्थित आहोत. निवडणुकीबद्दल सांगायचं झालं तर एका वाक्यात सांगेन विजय हा आमचा, गुळाल आमचा आहे. विकास कामे आम्ही केलीत.कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव यांचा पूर्ण आशीर्वाद या गटाला आहे त्यामुळे या तालुक्याचा सचिव म्हणून निश्चितपणे सांगेन या तालुक्यातील सगळ्या सीटा या विजयी होतील. या भागाचं जर सांगायचं झालं तर नेतृत्व आम्ही स्वतः करतोय आमचे सगळे कार्यकर्ते प्रचार यंत्रणेत उतरलेत. इथे तळगाळातून मतदार म्हणतात की, या वेळेला मशाल पेटवायची आहे. सचिनशेठ बाईत पडवे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहेत आणि पंचायत समिती गणनातून रवींद्र आंबेकर उमेदवारी लढवत आहेत तसेच पाचेरी सडा jपंचायत समिती गणातून शशिकला मोरे या उमेदवारी लढवत आहे या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्णय हा इथल्याच मतदारांनी घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणचा विजय हा निश्चित असून मतदारांनी घेतलेला निर्णय आहे अशी माहिती विलास गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.















