महामार्गावर माणुसकीचा पराभव! महिलांना व चिमुकल्याला प्रसाधनगृह वापरण्यास नकार — प्रशासन गप्प, नियम केवळ कागदावर?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महामार्गावर माणुसकीचा पराभव!

महिलांना व चिमुकल्याला प्रसाधनगृह वापरण्यास नकार — प्रशासन गप्प, नियम केवळ कागदावर?

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये महिला व बालहक्कांची निर्लज्ज पायमल्ली

रोहा (जि. रायगड) (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जर महिलांना व लहान मुलांना प्रसाधनगृहासारख्या मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर हा प्रकार केवळ धक्कादायक नसून माणुसकीला काळिमा फासणारा आहे. रोहा तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेमुळे महिला सुरक्षा, बालहक्क आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र व संतप्त प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९:४५ वाजता, महाबळेश्वर येथून मुंबईकडे येणाऱ्या ४० प्रवाशांच्या गटाला (यामध्ये ७ महिला व एक दोन वर्षांचा चिमुकला यांचा समावेश होता) माणगाव येथे जवळपास दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. दीर्घ प्रवास, थकवा आणि अस्वस्थतेमुळे प्रवाशांनी जेवण व प्रसाधनगृहासाठी रोहा तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या ‘हॉटेल मालवणी’ येथे थांबण्याचा निर्णय घेतला.

मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्याने “मोठ्या गाड्या येथे घेत नाही” असे सांगत जेवण देण्यास नकार दिला. प्रवाशांनी तो निर्णय मान्य करून, आपत्कालीन परिस्थितीत महिलांना व लहान मुलाला प्रसाधनगृह वापरण्याची परवानगी द्यावी, अशी नम्र विनंती केली. त्यावर संबंधित कर्मचाऱ्याने महिलांशी अरेरावीची भाषा वापरत, जोरजोरात वाद घालत प्रसाधनगृह वापरण्यास थेट मनाई केली.

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आस्थापनांनी प्रवाशांना—विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना—प्रसाधनगृहासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये, हे शासकीय नियम स्पष्ट असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार केवळ नियमभंग नसून महिला व बालहक्कांची उघड पायमल्ली आहे आणि तो मानवी प्रतिष्ठेवर केलेला थेट आघात मानला जात आहे.

प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि सन्मानासाठी जबाबदार असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा नेमक्या कुठे आहेत? महामार्गालगत सुरू असलेल्या हॉटेल्सवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची, आणि ती जबाबदारी प्रत्यक्षात पार पाडली जाते की नाही, असा थेट व संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. नियम अस्तित्वात असतील, तर त्यांची अंमलबजावणी का होत नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

सदर प्रकरणी संबंधित हॉटेलवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात कोणत्याही महिलेला, बालकाला किंवा ज्येष्ठ नागरिकाला अशा अमानवी वागणुकीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महामार्गालगतच्या सर्व आस्थापनांना स्पष्ट व सक्त निर्देश देण्यात यावेत, अशी जोरदार मागणी विजय अंधारे यांच्या वतीने करण्यात आली आहे. माणुसकीऐवजी मुजोरी सहन केली जाणार असेल, तर महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित कसा राहील, हा प्रश्न आता प्रशासनासमोर ठामपणे उभा ठाकला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार