पडवे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात चुरशीची लढत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पडवे जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात चुरशीची लढत

निलेश सुर्वे, रवींद्र आंबेकर यांच्यासमोर आनंद भोजने ठरणार अडसर?

गुहागर :

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गुहागर तालुक्याचे लक्ष पडवे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकडे लागले आहे. आमदार भास्कर जाधव आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिष्ठेची केलेली ही लढत अत्यंत चुरशीची होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

पडवे जिल्हा परिषद गट : शिंदे सेना विरुद्ध ठाकरे गट

पडवे जिल्हा परिषद गटातून विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर (शिंदे सेना) आणि सचिन वाईत (शिवसेना ठाकरे गट) यांच्यात काट्याची टक्कर होत आहे.

महेश नाटेकर यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जात असून, मागील कार्यकाळातील विकासकामे, मजबूत जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे याच्या जोरावर विजय मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणारे सचिन वाईत यांना निष्ठावान शिवसैनिकांची साथ, तालुका प्रमुख म्हणून कार्य,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान, तसेच तरुण वर्गाचा वाढता पाठिंबा मिळत असून विजयाबाबत ते आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.

पडवे पंचायत समिती गण : तिघांचा दावा, तिघांनाही विजयाची खात्री

पडवे पंचायत समिती गणात भाजपचे निलेश सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे रवींद्र आंबेकर आणि अपक्ष आनंद भोजने असे तिघे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

निलेश सुर्वे – भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. शांत स्वभाव, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग आणि तरुण वर्गातील स्वीकारार्हता हे त्यांचे बलस्थान मानले जात आहे.

रवींद्र आंबेकर – माजी पंचायत समिती सदस्य, अनुभवी व निष्ठावंत शिवसैनिक आणि  जातीय मतांची बेगमी,मागील कार्यकाळातील विकासकामांच्या जोरावर विजय मिळवण्याचा विश्वास.

आनंद भोजने – पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून शिवस्वराज्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न उपोषण व आंदोलनातून मांडल्यामुळे ‘डॅशिंग नेता’ अशी ओळख निर्माण झाली आहे. त्यांची उमेदवारी प्रस्थापित उमेदवारांसाठी अडसर ठरू शकते, अशी चर्चा आहे.

भंडारी समाजाची भूमिका ठरणार निर्णायक?

तवसाळ–पडवे परिसरातील भंडारी समाज यावेळी कोणाच्या बाजूने उभा राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मागील निवडणुकीत महेश नाटेकर यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारी भंडारी युवा ब्रिगेड यावेळी प्रचारापासून काहीशी अलिप्त दिसत आहे.

स्थानिक विकासापेक्षा विशिष्ट भागांना जास्त महत्त्व दिले जात असल्याची नाराजी समाजात असून, त्याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपक्ष आनंद भोजने गेमचेंजर?

पडवे पंचायत समिती गणात खरी रंगत निर्माण झाली आहे ती आनंद भोजने यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे.

भाजपचे निलेश सुर्वे आणि शिवसेना ठाकरे गटाचे रवींद्र आंबेकर हे दोघेही संघटनात्मक ताकदीवर अवलंबून असले, तरी आनंद भोजने यांनी आंदोलन, उपोषण, शेतकरी प्रश्न या मुद्द्यांवर थेट जनतेशी नाळ जोडली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते,

➡️ आनंद भोजने यांना मिळणारी मते कोणाचा विजय थांबवणार हेच खरी किल्ली ठरणार आहे

तरुण मतदार, सोशल मीडियाचा प्रभाव

यंदा तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असून,

थेट भेटी, छोट्या सभा, सोशल मीडियावरील प्रचार

याला जास्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः निलेश सुर्वे आणि आनंद भोजने यांना तरुणांचा ओघ वाढताना दिसतो आहे.

सध्या कोणाची हवा ~ पडवे, तवसांळ, बाबर तांबड, कातlळे, कुडली  या भागात निलेश सुर्वे, महेश नाटेकर, आनंद भोजने हे चांगली मतदान घेतील.

तर जांभारी, माटळ वाडी तांबडवाडी, आबलोली  येथून सचिन वाईत, रविंद्र आंबेकर, याना जोर आहे .

तर ऐन वेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले कुडली येथील जेष्ठ कार्यकर्ते वसंत किल्लेकर यांना मानणाऱ्या मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतील हें सुद्धा पाहणं महत्वाचं…..

एकंदरीत, पडवे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात रंगतदार व अनिश्चित लढत पाहायला मिळणार असून, अंतिम निकालात स्थानिक समाजघटकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात