कोकणचे सुपुत्र कवी लेखक मा. शशांक कोंडविलकर यांना राज्यस्तरीय कलाभुषण पुरस्काराने सन्माननीत
नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील जानावळे गावचे सुपुत्र व सध्या कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेले मा. कवि. लेखक शशांक कोंडविलकर यांना दिशा महाराष्ट्राची या यु टूब पोर्टल चैनलच्यावतीने नवीमुंबई येथे राज्यस्तरीय कलाभुषण पुरस्काराने मा. अँण्ड. विजय उंबरे यांच्या शुभ हस्ते सन्माननीत करण्यात आले. शशांक कोंडविलकर यांनी झी मराठी ई टिव्ही मराठी स्टार प्रवाह मी मराठी साम टिव्ही अशा प्रसार माध्यमातून दिग्दर्शक लेखक संकलक म्हणून लिलया जबाबदारी पार पाडली आहे. तसेच गेली वीस वर्ष अखंडपणे गीतलेखनाच्या क्षेत्रात कार्यरत राहुन टि सिरिज सुमित म्युसिक सारेगमा यांच्या सारख्या देशातील नामांकित संगीत संस्थासाठी दर्जेदार गीताची त्यांनी निर्मिती केली आहे. तसेच यु टूब चैनल साठी पहिल्याच गीताचे लेखन दिग्दर्शन आणि संकलन स्वतः संभाळलले आहे. सुरेशजी वाडकर नंदेश उमप नेहा राजपाल सावणी रविंद्र आर्या आंबेकर रोहीत राऊत हर्षवर्धन वावरे सोनाली सोनावणे स्वप्नील बादोडकर यांच्या सारख्या आघाडीच्या गायकांनी शशांक कोंडविलकर यांच्या गीताना आवाज बहाल केला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पहीली काँमेडी यु टूब चँनेल आय झेड कोकणातले तयार करून कोकणातील कलाकारांना संधी दिली त्याचे सुञधार दिग्दर्शक संकलक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. झी मराठी मध्ये प्रोमो प्रोड्युसर म्हणून काम करत आहेत तसेच गीतलेखन दिग्दर्शन संकलन ही चालु आहे मराठी चित्रपट सृष्टीत गीतलेखनाच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतः ची ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या योगदाना बद्दल दिशा महाराष्ट्राची या यु टुब चैनेलने राज्यस्तरीय मानाचा ओळखला जाणारा कलाभुषण पुरस्कार देऊन दि. 1/2/2026 रोजी डाँ. बाबा साहेब आंबेडकर समता भवन जुईनगर नवीमुंबई या ठिकाणी सन्माननीत करण्यात आले. कार्यक्रमाला दिशा महाराष्ट्राची या चैनेलचे संपादक मा. तुषारजी नेवरेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम चव्हाण अभिनेते राजेश जाधव मा. अर्चना मोहीते एँण्ड विजय उंबरे निखिल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.















