नालासोपाऱ्यात भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नालासोपाऱ्यात भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न

नालासोपारा (गुरुदत्त वाकदेकर) : जय हनुमान क्रिकेट संघ, बामणघर यांच्या वतीने आयोजित पर्व–२ भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा २०२६ रविवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी नालासोपारा येथील अब्राहम टर्फ चक्रेश्वर तलाव मैदान, कोकाकोला डिस्ट्रिब्युटर समोर, नालासोपारा वेस्ट येथे उत्साहात पार पडली. अविनाश जाधव यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

स्पर्धेचे विजेतेपद दोस्ती–११ पाट संघाने (प्रथम क्रमांक) पटकावत १५,००० रुपये रोख आणि आकर्षक चषक जिंकला. हे पारितोषिक दिपक बावकर, दिनेश बागवे आणि संजय जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कालिका क्रीडा मंडळ जांभुळनगर पालवणी संघाने द्वितीय क्रमांक मिळवत १०,००० रुपये रोख आणि चषक पटकावला. हे पारितोषिक दिपक बावकर, शिवाजी कदम आणि सचिन चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. माऊली प्रतिष्ठान संघाने तृतीय क्रमांक मिळवत ३,००० रुपये रोख आणि चषक पटकावला. हे पारितोषिक निलेश पालांडे आणि काशिनाथ चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. स्मरण–११ बामणघर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवत २,००० रुपये रोख आणि चषक पटकावला. हे पारितोषिक विनेश साळवी आणि योगेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भरत (कालिका क्रीडा मंडळ पालवणी) यांना कृष्णा चव्हाण आणि नंदकुमार जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून रितिक (दोस्ती–११ पाट) यांना शुभम आणि आशिष यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत शिवम–११ पेवकोंड, पालवणी स्ट्रायकर्स, स्मरण–११ बामणघर, दोस्ती–११ चिपळूण, अमरज्योत–११ देव्हारे, महाकाली संघ पालवणी, श्री भैरी भवानी क्रीडा संघ सावेळी, दोस्ती–११ पाट, माऊली प्रतिष्ठान, स्वरा–११ खारेपाटण, गणेश–११ संगमेश्वर, भैरी भवानी क्रिकेट संघ तळेघर, संदीप–९, कालिका क्रीडा मंडळ पालवणी, गुहागर बॉईज आणि भैरी क्रिकेट संघ आतखोल आदी संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत विविध गटांतील २८ सामने खेळविण्यात आले. सामन्यांदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी काशिनाथ चव्हाण, निलेश पालांडे, योगेश जाधव, शुभम चव्हाण, कृष्णा चव्हाण, आशिष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. विनेश साळवी, सचिन चव्हाण, राहुल साळवी, नंदकुमार जाधव, मनिष जाधव, विनोद साळवी, राहुल म्हामुणकर, दगडू म्हामुणकर, संजय जाधव, रोहन कदम, यश चव्हाण, यांच्यासह स्मरण चव्हाण, वेद साळवी आणि अद्विक जाधव यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. अनेक देणगीदारांनी आर्थिक व वस्तुरूपात मोलाचे सहकार्य केले. सर्व देणगीदारांचे आणि सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. स्पर्धेचे समालोचन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.

या भव्य क्रिकेट स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह संचारला असून, युवकांना खेळासाठी प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय

बास डे लीडेची अष्टपैलू चमक; नेदरलँड्सचा नामिबियावर दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयसीसी...
Read More

खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

🏅 खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद...
Read More
खेडेगावातून महाराष्ट्राच्या टॉप १० मध्ये! कोपरगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र सब-ज्युनियर चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रुण गावच्या कु. अन्वी विनोद जाधवची दमदार कामगिरी

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय   आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजप महायुतीचे एकहाती वर्चस्व,...
Read More
लांजा तालुक्यात महायुतीचा झेंडा; १२ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक

‘अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक   येवला, नाशिक येथे कापसे फाऊंडेशनतर्फे आयोजन; समरस आणि...
Read More
अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक

भ्रष्टाचाराला लगाम! रेशन कार्डधारकांना थेट पैसे देण्याचा केंद्र सरकारचा विचार; धान्य वितरण बंद होणार का?

  🚫 भ्रष्टाचाराला लगाम! रेशन कार्डधारकांना थेट पैसे देण्याचा केंद्र सरकारचा विचार; धान्य वितरण बंद होणार का?   👉 PDS...
Read More
भ्रष्टाचाराला लगाम! रेशन कार्डधारकांना थेट पैसे देण्याचा केंद्र सरकारचा विचार; धान्य वितरण बंद होणार का?

नालासोपाऱ्यात भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न

नालासोपाऱ्यात भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न नालासोपारा (गुरुदत्त वाकदेकर) : जय हनुमान क्रिकेट संघ, बामणघर यांच्या...
Read More
नालासोपाऱ्यात भव्य टर्फ अंडर आर्म लीग क्रिकेट स्पर्धा जल्लोषात संपन्न

मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजय

मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी...
Read More
मुझारबानीच्या भेदक माऱ्याने आणि बेनेटच्या संयमी खेळीवर झिम्बाब्वेचा ओमानवर ८ गडी राखून दणदणीत विजय

मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय

मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६...
Read More
मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय

सायफर्टच्या वादळी खेळीवर न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून थरारक विजय

सायफर्टच्या वादळी खेळीवर न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६...
Read More
सायफर्टच्या वादळी खेळीवर न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर ५ गडी राखून थरारक विजय

जॅक्सच्या अष्टपैलू खेळीवर इंग्लंडचा नेपाळवर ४ धावांनी थरारक विजय

जॅक्सच्या अष्टपैलू खेळीवर इंग्लंडचा नेपाळवर ४ धावांनी थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
जॅक्सच्या अष्टपैलू खेळीवर इंग्लंडचा नेपाळवर ४ धावांनी थरारक विजय
Play sound