अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अनुलोम संगम-2026’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित स्वयंसेवकांचे कौतुक

येवला, नाशिक येथे कापसे फाऊंडेशनतर्फे आयोजन; समरस आणि भेदभावरहित समाजनिर्मितीचे कार्य प्रेरणादायी – मुख्यमंत्री फडणवीस

येवला (नाशिक) :

राष्ट्रनिर्मितीचा वसा जोपासणाऱ्या अनुलोम परिवाराच्या कार्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. येवला, नाशिक येथे अनुगामी लोकराज्य अभियानांतर्गत कापसे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘अनुलोम संगम-2026’ या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासासाठी समर्पणाची भावना अत्यंत महत्त्वाची आहे आणि अनुलोमचे स्वयंसेवक हीच भावना मनात ठेवून कार्य करत आहेत, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांनुसार समाजातील अडचणी दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून प्रभावीपणे होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुलोम संस्थेने समाजातील विविध क्षेत्रांतून नेतृत्व घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले असून, प्रगतिशील, समरस आणि एकजूट समाज उभारण्यात अनुलोमचे योगदान मोलाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विविध उपक्रमांद्वारे भेदभावरहित समाजनिर्मितीचा प्रयत्न सुरू असून, ‘संवादिनी’ उपक्रमातून ५०० महिला स्वयंसेवकांचा सहभाग हे समरसतेचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुलोमच्या प्रत्येक स्वयंसेवकाचे समाजातील योगदान महत्त्वाचे असून, हा परिवार अधिक व्यापक व्हावा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी अनुलोमचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

कार्यक्रमादरम्यान पद्मश्री श्रीरंग लाड, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळकृष्ण कापसे तसेच अनुलोमच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध जनसेवकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन