मराठी ज्ञानभाषेकडे वाटचाल : ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी ज्ञानभाषेकडे वाटचाल : ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : “मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रसार करणे आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करणे हे काम मराठी विज्ञान परिषद गेली अनेक वर्षे करीत आहे. ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे,” असे प्रतिपादन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री. दा. कृ. सोमण यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित आणि लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष, प्राध्यापक नामदेव मांडगे, साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. नरेंद्र पाठक, तसेच लोकवाङ्मय गृह प्रकाशनचे संपादक अक्षय शिंपी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठा मंडळ ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे आणि सरचिटणीस राजेंद्र साळवी यांनी आयोजक म्हणून सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात सतीश सोळांकूरकर आणि शंकर वैद्य यांनी लिहिलेल्या विज्ञानगीताने झाली.

या पुस्तकात आवर्तसारणीतील ११८ मूलद्रव्यांची माहिती ग्रामीण विद्यार्थ्यांनाही समजेल अशा सोप्या मराठी भाषेत मांडण्यात आली आहे. त्यासोबत आवश्यक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पनाही स्पष्ट केल्या आहेत. पुस्तकातील माहिती अचूक राहावी आणि परिभाषा विद्यार्थ्यांना समजावी यासाठी अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याचे लेखक हेमंत साने यांनी सांगितले. पुस्तकाला डॉ. मानसी राज्याध्यक्ष यांची प्रस्तावना असून, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे ब्लर्ब लाभले आहे. मुखपृष्ठाची रचना गायक, संगीतकार व चित्रकार मिलिंद जोशी यांनी केली आहे.

पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी समीर साने, विद्यालंकार घारपुरे, अरूण वेळासकर आणि सुरेश जंगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मानसी राज्याध्यक्ष यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणातून आवर्तसारणीचे महत्त्व उलगडले. हेमंत साने यांच्या लेखनातील लयबद्धतेमुळे विज्ञानाच्या पुस्तकातील माहिती रसपूर्ण वाटते, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. नरेंद्र पाठक यांनी विज्ञानविषयक साहित्य मराठीत निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्राध्यापक नामदेव मांडगे यांनी दिमित्री मेंडेलिव्ह यांच्या कार्याचा उल्लेख करून ८ फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस आणि ९ फेब्रुवारीला या पुस्तकाचे प्रकाशन हा योगायोग असल्याचे सांगितले. मराठा मंडळ ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी आभारप्रदर्शन केले. सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले.

कार्यक्रमाला रंगतज्ज्ञ विलास गुप्ते, अभिनेत्री संपदा जोगळेकर, लोककला प्रसारक शैला खांडगे, कवी सतीश सोळांकूरकर, पत्रकार शिवाजी गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील शिक्षकांच्या प्रतिक्रिया व्हिडिओद्वारे दाखवण्यात आल्या. कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांनी उत्साहाने पुस्तक खरेदी केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांची...
Read More
सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू