श्रीगोंदा नगरपरिषदेच्या 225 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषद सभेमध्ये मंजुरी

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या 225 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषद सभेमध्ये मंजुरी

श्री गोंदा (नंदकुमार बागडेपाटील)

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुनीताताई खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत प्रभावी आणि विधायक भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी मांडत शहराच्या विकासासाठी कार्यक्षम आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या बैठकीत पारगाव रोड बायपास येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची व महात्मा फुले सर्कल बायपास येथे 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यास एकमताने मान्यता दिली श्री. संत शेख महंमद महाराज देवस्थानच्या विकासासाठी तीर्थशेत्र पर्यटन योजनेअंतर्गत रु. १० कोटीची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. श्री. भैरवनाथ देवस्थान विकसित करण्यासाठी पर्यटन मध्ये तरतूद करण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अल्पसंख्यांक समाजाच्या विविध योजनासाठी 5 % राखीव निधीची तरतुद करण्यात आली शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे ऐतिहासिक वारसा असलेल्या महादजी शिंदे इमारत, विजयचौक झेंडावेस आणि दिल्ली वेस यांचे संवर्धन व सुशोभीकरण करणे शहरात संविधान भवन व बुद्धविहार उभारणे,, मौलाना आझाद अल्पसंख्यांक निधी मर्यादा वाढवणे,, इंदिरानगर, वेळू रोड सावित्रीबाई फुलेनगर , पेडगाव रोड सावंतवस्ती,, सोनवणेनगर,, गजानननगर येथील तसेच शहरातील विविध सरकारी जागेवरील लोकांना पक्के व हक्काचे घर देणे याचबरोबर शहर स्वच्छता,, सुरळीत पाणीपुरवठा दर्जेदार रस्ते,, ओपन जिम,, बगीचा सुशोभीकरण,, दिव्यांग बांधवाना विशेष तरतूद ,, घरकुल योजना ,, दिवाबत्ती ,,सौरऊर्जा प्रकल्प या सर्वच विषयांना मान्यता देण्यात आली या बैठकीसाठी उपनगराध्यक्ष अलकाताई अनभुले बांधकाम समिती सभापती कोमलताई बोरुडे ,,आरोग्य समिती सभापती प्रशांत गोरे ,, पाणीपुरवठा समिती सभापती शहाजी खेतमाळीस ,, महिला बालकल्याण समिती सभापती मीराताई शिंदे ,, नगरसेवक मछिंद्र शिंदे ,, राजेंद्र खेडकर ,, महावीर पटवा ,, आमीनभाई शेख नगरसेविका चांदणीताई खेतमाळीस,, वंदनाताई घोडके,, सोनालीताई गोरे ,, सुनीताताई घोडके,,अश्विनीताई काळे ,, मनीषाताई आनंदकर यांनी सुचवलेले रस्ते, ड्रेनेज, शाळा परिसर सुशोभीकरण आणि सामाजिक प्रश्न या सर्व मागण्यांना प्रधान्याने मंजुरी देण्यात आली यावेळी प्रशासनाच्या वतीने श्रीमती पुष्पगंधा भगत ( मुख्याधिकारी मॅडम ) यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला लेखापाल नन्नवरे मॅडम यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिल्याच अर्थसंकल्पात शहराच्या या महत्त्वाकांक्षी गरजा अतिशय प्रभावीपणे मांडल्या असून, प्रशासन आणि सर्व नगरसेवकांच्या अभूतपूर्व समन्वयातून साकार झालेल्या या विकासक्षम अर्थसंकल्पातुन श्रीगोंदा शहराच्या प्रगतीची नवी दिशा निश्चित होईल तसेच शहर विकासासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध राहु असा विश्वास सभागृहास आहे

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या 225 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषद सभेमध्ये मंजुरी

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या 225 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषद सभेमध्ये मंजुरी श्री गोंदा (नंदकुमार बागडेपाटील) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती सुनीताताई खेतमाळीस यांच्या...
Read More
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या 225 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरपरिषद सभेमध्ये मंजुरी

भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय

भारताचा झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील सुपर–८ गट १ सामन्यात...
Read More

मारक्रमचा महास्फोट; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत, वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून दणदणीत पराभव

मारक्रमचा महास्फोट; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत, वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून दणदणीत पराभव   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष...
Read More
मारक्रमचा महास्फोट; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत, वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून दणदणीत पराभव

नेहरू विज्ञान केंद्रात मराठी-मल्याळी महोत्सवाचा थाटामाटात समारोप; बहुभाषिक मुंबईत एकता साजरी

नेहरू विज्ञान केंद्रात मराठी-मल्याळी महोत्सवाचा थाटामाटात समारोप; बहुभाषिक मुंबईत एकता साजरी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): मराठी-मल्याळी जातीय महोत्सवाच्या सातव्या आवृत्तीचा...
Read More
नेहरू विज्ञान केंद्रात मराठी-मल्याळी महोत्सवाचा थाटामाटात समारोप; बहुभाषिक मुंबईत एकता साजरी

मराठी भाषा गौरव दिनी दादर ठरणार साहित्य-संस्कृतीचा साक्षीदार; सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेचा मानाचा पुरस्कार सोहळा

मराठी भाषा गौरव दिनी दादर ठरणार साहित्य-संस्कृतीचा साक्षीदार; सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेचा मानाचा पुरस्कार सोहळा   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
मराठी भाषा गौरव दिनी दादर ठरणार साहित्य-संस्कृतीचा साक्षीदार; सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक स्पर्धेचा मानाचा पुरस्कार सोहळा

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर प्रहार; ६१ धावांचा दणदणीत विजय, सुपर–८ मधील पहिला संघ बाद

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर प्रहार; ६१ धावांचा दणदणीत विजय, सुपर–८ मधील पहिला संघ बाद   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२०...
Read More
न्यूझीलंडचा श्रीलंकेवर प्रहार; ६१ धावांचा दणदणीत विजय, सुपर–८ मधील पहिला संघ बाद

मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा मुंबई | प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ मुंबई विभागीय बैठक...
Read More
मराठा महासंघाची मुंबईत विभागीय बैठक; रोजगार- उद्योग कार्यशाळा आयोजनाची घोषणा

दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

दिवा परिसरातील धाबे बनलेत 'ओपन बार'; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी ​विशेष प्रतिनिधी /अरविंद कोठारी दिवा:...
Read More
दिवा परिसरातील धाबे बनलेत ‘ओपन बार’; बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी   वसईतील सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा संकल्प कुटुंबियांनी केला पूर्ण नवीमुंबई (मंगेश जाधव): वसई...
Read More
आभा परिवर्तनवादी संस्थेमार्फत पहिले मरणोत्तर अवयवदान यशस्वी

चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

🚨 चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा चिपळूण: तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र (ACB) कडे तक्रार दाखल केल्यानंतर चिपळूण...
Read More
चिपळूणमध्ये ACBचा सापळा; PSIसह खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Play sound