तळवलीत आज रंगणार दोन बहीणीचा पालखी भेट सोहळा भक्तांनमध्ये नवचैतन्याचे वातावरण
तळवली(मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले तळवली गावची ग्रामदैवत श्री. सुकाई देवी व पेवे गावची ग्रामदेवता श्री. झोलाई देवीचा शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दोन बहीणीचा पालखी भेट सोहळा आज तळवली ग्रामदेवता सहाण प्रागंणात मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे या वेळी प्रथमच या पालखी भेट सोहळ्याचे युट्युब द्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नोकरी निमित्त बाहेर गावी असणारे भक्तांना हा पालखी भेट सोहळा प्रत्यक्ष पाहाता येणार आहे या दोन बहीणीची भेट प्रसिद्ध असून यावेळी दोन्ही पालख्यामधील नारळाची अदलाबदल होते अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगितली जाते यावर्षी देखील मोठ्या उत्साही वातावरणात नियोजनबध्द हा पालखी भेट सोहळा पार पडणार आहे. या अनोख्या पालखी भेट सोहळ्यासाठी विविध ठिकाणाहून भाविक उपस्थित असतात यावेळी तळवली गावाला जणू जञेचे स्वरुप प्राप्त होते या पालखी भेट सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. सुकाई देवी देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.














