बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

रत्नागिरी :- निलेश रहाटे

वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3 वर्ष 9 महिन्यांपासून शौचालय गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू असूनही आजपर्यंत वरिष्ठ कार्यालयासह जिल्हा परिषद सीईओ कार्यालयाकडून कोणत्या ही दोषी लोकसेवक वर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात नेमके किती लोकसेवक दोषी आहेत, हेही अद्याप प्रशासन स्पष्ट करत नाही.
अशा परिस्थितीत तत्कालीन सरपंच अनिकेत सुर्वे यांना जिल्हा परिषद रत्नागिरीच्या बांधकाम विभागाने ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र दिले कसे, हा गंभीर प्रश्न RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी उपस्थित केला होता.

या संदर्भात निलेश रहाटे यांनी बांधकाम विभागाकडे लेखी आक्षेप नोंदवून, शौचालय गैरव्यवहार प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ठेकेदार नोंदणी तात्पुरते स्थगित किंवा रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती.

या मुद्द्यावर आवाज उठल्यानंतर संबंधित ठेकेदार अनिकेत सुर्वे यांनी स्वतःच्या इच्छेने ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बांधकाम विभागाला लेखी विनंती केल्याचे समजते. त्या विनंतीवर कार्यवाही करत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या बांधकाम विभागाने त्यांची ठेकेदार नोंदणी रद्द केली असल्याचे उपलब्ध कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.

सदर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शौचालय गैरव्यवहार प्रकरणाबाबत सन 2022 पासून विविध तक्रारी दाखल असून चौकशी प्रक्रिया अद्याप सुरू आहे. चौकशी प्रलंबित असताना संबंधित व्यक्तीस ठेकेदार म्हणून पात्रता देण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला, हा प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आला होता.

ठेकेदार नोंदणी रद्द करण्यात आली असली तरी रद्दीकरण आदेशाची माहिती सर्व संबंधित विभागांना देण्यात आली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभाग, पंचायत समिती तसेच ई-टेंडर प्रणालीमध्ये ही नोंद अद्ययावत करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही.
रद्दीकरण आदेशाची माहिती वेळेत सर्व विभागांना न कळवल्यास किंवा नोंदी अद्ययावत करण्यात विलंब झाल्यास शासकीय कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात रद्दीकरण आदेशाची माहिती सर्व संबंधित कार्यालयांना तात्काळ कळवून ई-प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, ठेकेदार नोंदणी रद्द झाली असली तरी मूळ शौचालय गैरव्यवहार प्रकरणातील चौकशी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून संबंधित विभाग या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील कार्यवाही करणार की पुन्हा या प्रकरणाचा पाठपुरावा करावा लागणार.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा